सद्यःस्थितीत कोकण विभागामध्ये आंबा पिकामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून तुरळक प्रमाणात मोहोर येऊ लागतो. त्याचे प्रमाण डिसेंबर-जानेवारी महिन्यात वाढते.
१. तुडतुडे
उपाययोजना ः
आंबा मोहोर संरक्षणाचे सुधारित वेळापत्रक (प्रति १० लिटर पाणी) पहिली फवारणी ः पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) ९ मि.लि. - या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यापासून संरक्षण होते. दुसरी फवारणी ः (बोंगे फुटताना) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि. या फवारणीमध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने (५ टक्के) हेक्झाकोनॅझोल ५ मि.लि. किंवा पाण्यात विरघळणारे (८० टक्के गंधक) २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी (१२ टक्के) कार्बेन्डाझिम अधिक (६३ टक्के) मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) ः शिफारशीप्रमाणे - तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाच्या द्रावणामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी (५ टक्के) हेक्झाकोनॅझोल ५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसेल तर पाण्यात विरघळणारे (८० टक्के गंधक) २० ग्रॅम तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी १२ टक्के कार्बेन्डाझिम + ६३ टक्के मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) शिफारशीप्रमाणे -
पाचवी फवारणी (चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने) डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) किंवा लॅम्बडा सायहेलोथ्रीन (५ टक्के) १० मि.लि. ६ मि.लि.
सहावी फवारणी (पाचव्या फवारणी नंतर गरज असल्यास १५ दिवसांच्या अंतराने) पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या कीटकनाशकापैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यासच फवारणी करावी.
टीप ः मोहोराच्या अवस्थेमध्ये फवारणी करताना मधमाशांना हानीकारक कीटकनाशकांचा वापर टाळावा. २.फुलकिडे
डॉ. आनंद नरंगलकर (विभाग प्रमुख), ९४०५३६०५१९ डॉ. बी. डी. शिंदे (सहायक प्राध्यापक), ८००७८२३०६० डॉ. अंबरीष सणस (संशोधन सहयोगी), ९९६०३३२३७० (कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.