

पुणे - आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात (International edible oil market) निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दर कमी होतील असे वाटत नाही. महत्वाच्या खाद्यतेल उत्पादक देशांतील परिस्थितीमुळे दर वाढले आहेत. परिणामी पुढील काही काळ तरी आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातही दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असं जाणकारांनी सांगितलं.
हे ही वाचा - ब्राझील, अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटणारः युएसडीए
मलेशियात पामतेलाचे (Palm oil) उत्पादन कमी होत असून दरात पुन्हा वाढ झाली आहे. तर इंडोनेशियाने निर्यातीवर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या पामतेलाचे दर गगणाला भीडले आहेत. सोयाबीन (Soybean) उत्पादनात अग्रेसर असलेल्या ब्राझील आणि अर्जेंटीनात प्रतिकूल वातावरणामुळे पिकाला फटका बसत आहे. त्यामुले सोयाबीन उत्पानात घट होण्याचा अंदाज आहे. यामुळे सीबाॅटवर सोयाबीन वायद्यांत तेजी आली आहे. तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये विविद सुरु आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाची उपलब्धता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच पामतेल उत्पादक मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांत आणि सोयाबीन उत्पादक ब्राझील आणि अर्जेंटीनामध्ये तसेच सूर्यफूल उत्पादक रशिया आणि युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या परिस्थिमुळे या तेलांचा पुरवठा कमी होण्याचा अंदाज आहे.
जागतीक पातळीवर कच्चा तेलाच्या (crude oil) किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे बायोडिझेल निर्मितीत खाद्यतेलाचा वापर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अशा अनेक कारणांमुळे खाद्यतेलाच्या दरात तेजी कायम राहिल अशी परिस्थिती आहे. कारण भारतात इंडोनेशिया आणि मलेशियातून पाम तेल आयात होते. ब्राझील आणि अर्जेंटीनातून सोयाबीन तेल मागवले जाते. तर सूर्यफूलासाठी युक्रेन आणि रशियावर अवलंबून आहे. या देशांतील परिस्थितीचा थेट देशातील खाद्यतेल दरावर परिणाम होतो.
भारत सरकारने खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी आणि पुरवठा वाढीसाठी अनेक उपाय केले. आयात शुल्कात कपात, स्टाॅक लिमिट आणि वायदेबंदीचे निर्णय घेतले. एव्हढं सगळं करूनही सरकारला दर नियंत्रण करता आले नाही. त्याला मुख्य कारण म्हणजेच तेल पुरवठा करणाऱ्या देशांतील परिस्थिती.
व्हिडीओ पाहा - ……….. यंदा रब्बी हंगमात मोहरीचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल तेजीत राहिल्यास देशात मोहरीचे विक्रमी उत्पादन होऊनही दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे, असं जाणकारांनी सांगितलं. त्यामुळे भारताला खाद्यतेलाच्या वाढलेल्या दराचा समना करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेल तेजीत असल्याने देशातील सोयाबीन बाजाराला आधार मिळतोय. त्यामुळे दर टिकून आहेत, असंही जाणकारांनी सांगितलं.
…………
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल दरात तेजी आहे. याचा थेट परिणाम देशातील दरावर होतो. भारताला खाद्यतेल पुरवठा करणाऱ्या महत्वाच्या देशांतील परिस्थिती तेजीला पुरक ठरत आहे. - राहूल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया, नवी दिल्ली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.