पंढरपुरी म्हैस एवढी महाग कशी ?

म्हैस म्हटलं की डोळ्यासमोर येतो काळा रंग,भक्कम बांध्याची म्हैस. पण तलवारीच्या आकाराची शिंगे असलेली म्हैस म्हणजेपंढरपुरी.
why pandharpuri buffalo cost more than other buffalo?
why pandharpuri buffalo cost more than other buffalo?
Published on
Updated on

म्हैस म्हटलं की डोळ्यासमोर येतो काळा रंग, भक्कम बांध्याची म्हैस. पण तलवारीच्या आकाराची शिंगे असलेली म्हैस म्हणजे पंढरपुरी. सोलापूर जिल्यातील पंढरपूर (Pandharpur) तालुका हे तीच मूळ गाव आहे, या तालुक्यावरूनच तिला पंढरपुरी हे नाव पडलंय.  पंढरपुरी म्हैस (Pandharpuri) महाराष्ट्रतील सोलापूरबरोबरच कर्नाटक (Karnatak) राज्यातील धारवाड जिल्ह्यातही आढळून येत असल्यानं तिला धारवाडी असंही म्हंटल जातं. तलवारीच्या (Sword) आकाराच्या या शिंगाची लांब ४५ ते ५० सेंटीमीटर इतकी असू शकते. सोलापूर जिल्हा म्हटलं की दुष्काळी (Dry) भाग आठवतो, याचाच अर्थ ही म्हैस कडक उन्हात, कमी पावसाच्या प्रदेशात, निकृष्ट चाऱ्यावर तग धरून राहणारी काटक अशी जात आहे. म्हणजेच उत्तम व्यवस्थापन असल्यास दुधाचे उत्पादन हमखास वाढेल. 

हेही पाहा-  म्हशीला गायीसारखे पांढरे शुभ्र रेडकू, नेमकं काय आहे कारण? 

म्हशीचे वजन ४५० ते ५०० किलो इतके असते. दुधाचे उत्पादन ६ ते ७ लिटर इतके असते. उत्तम व्यवस्थापनात दुधाचे उत्पादन १५ लिटर पर्यंत जाऊ शकते. पारड्या वयाच्या २५ ते ३० महिन्याला गाभण राहून ३५ ते ४० महिन्यांत पहिल्यांदा वितात. मध्यम शरीर, लवकर वयात येणाऱ्या पारड्या, कमी भाकड काळ, पहिल्या वेताच्या वेळी कमी वय, उत्तम प्रजनन, दुग्धोत्पादनक्षमता आणि सातत्य यासर्व गुणांमुळे ही जात दुधासाठी चांगली आहे आणि तिला मागणीही जास्त आहे.

एका वेतातील दूध उत्पादन १५०० ते १८०० लिटरपर्यंत मिळते. लांब व निमुळता चेहरा, खांद्यापर्यंत पोचणारी लांब व पिळवटलेली शिंगे ही या जातीची वैशिष्ट्ये आहेत. या जातीचे रेडे ओढकामासाठी व शेतीच्या कामासाठी वापरले जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com