कोंबडीपालन करताय मग हे माहितीय का?

भारतात कोंबड्याचे पालन मुख्यत्वे दोन पद्धतीन केलेजाते. एक म्हणजे पिंजऱ्यातील कोंबडीपालन आणि दुसरेम्हणजे डीप लिटर मध्ये. या दोन्ही पद्धतीचे स्वतःचे असे फायदे तोटे आहेत. पण आजकाल मुक्त संचार पद्धतही अनेक लोक वापरताना दिसतायेत.
Poultry Farming
Poultry Farming
Published on
Updated on

भारतात कोंबड्याचे पालन मुख्यत्वे दोन पद्धतीन केलं जाते. एक म्हणजे पिंजऱ्यातील कोंबडीपालन आणि दुसरं म्हणजे डीप लिटर मध्ये. या दोन्ही पद्धतीचे स्वतःचे असे फायदे तोटे आहेत. पण आजकाल मुक्त संचार पद्धतही अनेक लोक वापरताना दिसतायेत.

पिंजऱ्यातील कोंबडीपालन-

याला इंग्रजीमध्ये केज सिस्टीम (cage system) असं म्हणतात. या पद्धतीत कोंबड्यांना प्रत्येकी ४०० ते ५०० चौरस सेंटीमीटर जागा दिली जाते.  एका पिंजऱ्यात एक, दोन किंवा तीन पक्ष्यांना एकत्र ठेवले जाते. कुक्कुटपक्षांच्या पिंजऱ्याची एका ओळीत लांब किंवा एकावर एक अशी मांडणी केलेली असते. पिंजऱ्यात प्रति युनिट (unit) जागेत जास्त पक्षी पाळले जातात. पिंजऱ्यातील पक्षांची देखभाल करणे सोयीचे जाते. कमी उत्पादक पक्षी ओळखून ते त्वरित वेगळे करणे, सोप्पे जाते. या पद्धतीत पक्षांना इतर नरभक्षक पक्षांचा धोका नसतो. या पद्धतीत स्वच्छ अंड्याच उत्पादन मिळण्यास मदत होते. कोक्सीडिओसिस आणि कृमीचा प्रादुर्भाव यांसारख्या परजीवी रोगांचे सहज नियंत्रण करता येते. जास्त प्रमाणात खाद्य वाया जात नाही. जास्त तापमान असलेल्या ठिकाणी या पद्धतीत कोंबड्यां उष्माघाताला लवकर बळी पडतात.

कोंबड्याच्या विष्ठेतून तयार होणारा अमोनिया वायु बाहेर जाण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याची गरज पडते. यामध्ये कोंबड्यांना केज फटिग (cage fatigue), पिंजऱ्याचा थकवा यांसारख्या समस्या दिसून येतात. पण खाद्याचं आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन करून ही समस्या दूर होऊ शकते. खाद्य आणि पाण्यासाठी नालीच्या आकाराची आणि अंडी गोळा होण्यासाठी जाळी मागे उतरती असून अंडी (eggs) पुन्हा मागून पुढे येऊन थांबतात.

हेही पाहा-कुक्कुटपालन व्यवसायासाठी लागणारे घटक

डीप लिटर सिस्टीम ही पद्धत आर्थिकदृष्ट्या परवडणारी असते. या पद्धतीत पक्षांना स्वच्छ, आरामदायक वातावरण मिळत असते. एका पक्षाला सुमारे १ ते २ चौरस फूटापर्यंत जागा दिली जाते. पक्षांची कार्यक्षमता वाढीस लागते. डीप लिटर सिस्टिम मध्ये बेडिंग मटेरीअल म्हणून भाताचा भुसा, लाकडाचा भुसा यांचा वापर केला जातो. हा थर साधारणपणे ३ ते ४ इंचापर्यंत ठेवला जातो. नंतर हाच भुसा शेतात खत म्हणून वापरला जातो. साधारणपणे ५० कोंबड्यापासून १ टन खताची निर्मिती होते. या पद्धतीत पक्षांचे बेड नेहमी स्वच्छ कोरडे राहील याची खबरदारी घेतली पाहिजे. पक्षांचे बेड एकदिवस आड हलवून घेतलं पाहिजे. वातावरण हवेशीर असावे, म्हणजे निर्माण होणारा अमोनिया (ammonia) साचून राहणार नाही. गादी ओलसर होऊ नये पाण्याच्या भांड्याचे योग्य व्यवस्थापन करावे. गादी ओलसर वाटल्यास चुना मारून घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com