
लिंग निर्धारित वीर्यमात्रा म्हणजेच सेक्स सॉर्टेड सीमेन असे म्हटले जाते. सेक्स सॉर्टेड सीमेन (Sex sorted semen) या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या गोठ्यात कमी वेळात जास्तीत जास्त मादी (Female) वासरे जन्माला येऊ शकतात. सध्या आपल्याकडे जास्त दूध उत्पादनासाठी संकरित आणि विदेशी जनावरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय.
गर्भ निर्मिती होताना नर किंवा मादीचा गर्भ तयार होणे हे शुक्राणु ठरवतात. सद्यस्थितीत नवीन तंत्रज्ञानाद्वारे शुक्राणूच्या केंद्रातील जणूकांच्या प्रमाणाचे मापन करून शुक्राणूंचे लिंग वर्गीकरण करण्यात येते. लिंग वर्गीकृत शुक्रानुपासून गोठीत वीर्य कांड्या तयार करण्यात आल्या असून त्यांचा वापर कृत्रिम रेतनासाठी करण्यात येतो.
हेही पाहा- साधारण विर्यमात्रा आणि लिंग आधारित विर्यमात्रा यांच्यात फरक काय ?
साधारण कृत्रिम रेतन (artificial insemination) करताना त्यातील शुक्राणुंची संख्या ही अब्जावधीमध्ये असते. याउलट लिंग निर्धारित विर्यमात्रेमध्ये Y शुक्राणू काढून टाकल्याने त्यातील हव्या असलेल्या X शुक्राणुंची संख्या कमी झालेली असते. म्हणूनच निरोगी, सुदृढ गर्भाशय असलेल्या जनावरांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरतो.
कृत्रिम रेतन करताना साधारण विर्यमात्रा आणि लिंग आधारित वीर्यमात्रा यांच्या गुणसूत्रांमध्ये विभिन्नता दिसून येते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वळूच्या वीर्यातील X आणि Y गुणसूत्रे असलेले शुक्राणू वेगळे करता येतात. म्हणजेच लिंग निर्धारित विर्यमात्रेत फक्त X गुणसुत्रे असणारे शुक्राणू असतात. यामुळे ९० टक्क्याहून जास्त प्रमाणात मादी वासरेच जन्माला येत असतात.
कंपनीमध्ये सध्या एका वीर्य कांडीची (semen straw) किमत रुपये- १०००- १२००/- एवढी आहे. परंतु नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नोंदणी केली तर महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत शेतकर्यांना सॉर्टेड सीमेनची एक वीर्य कांडी रुपये ८१/ रुपयांना मिळू शकते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.