
Poultry Management : पोल्ट्री उद्योगात कोंबड्यांचे खाद्य नियोजन ही सर्वात महत्वाची बाब आहे. एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च कोंबड्यांच्या खाद्यावरच होत असतो. सकस,पौष्टिक आणि संतुलित खाद्य मिळाले तरच मांस किंवा अंडी वजनदार मिळतात, कोंबड्यांची मरतूक कमी होते. पक्षांना खाद्य देतांना त्याचे पिल्ले ,ब्रॉयलर आणि लेअर अंडी देणाऱ्या अशा तीन प्रकारात खाद्य नियोजन स्वतंत्र करावे लागते . एकूण खाद्यापैकी फक्त ३५ ते ४५ टक्के खाद्याचे रूपांतर मांस किंवा अंड्यात होत असते. त्यामुळे कोंबड्यांना खाद्य देताना काय काळझी घ्यावी याविषयीची माहिती पाहुया.
अंडे देणाऱ्या कोंबड्यांची कमीत कमी ओलावा असलेले ताजे खाद्य द्यावे. त्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, चरबी, खनिज पदार्थ, व्हिटॅमिन्स यांचे संतुलन असणे गरजेचे आहे.
पक्ष्यांच्या वाढीसाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. कडधान्यांमध्ये सुमारे आठ ते बारा टक्के आणि द्विदल धान्यांमध्ये तीस ते चाळीस टक्के प्रथिने असतात. कोंबडीखाद्यामध्ये वनस्पतिजन्य प्रथिने आणि प्राणिजन्य प्रथिनांचा समावेश करावा.
मका ,गहू ,तांदूळ ,ज्वारी ,बाजरी असे पिष्टमय पदार्थ सोयाबीन सारखे चरबीयुक्त पदार्थ आणि व्हिटॅमिन्स ,खनिजद्रव्ये असावी लागतात. ज्वारी, गहू, मका, तांदूळ इ. धान्यांत पिष्टमय पदार्थ भरपूर असतात. हे घटक आहारात असावेत.
पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.
पक्ष्यांच्या वाढीसाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते. हे पदार्थ अन्न तुटवड्याच्या कालावधीमध्ये शरीरास उष्णता व कार्यशक्ती पुरवितात. स्निग्ध पदार्थांमुळे खाद्याला चांगली चव येते. सर्व प्रकारचे खाद्यतेल व चरबी यांपासून स्निग्ध पदार्थ मिळतात.
धान्य भरडून घेऊन घरीच आपल्या हाताने / स्वात:च्या निगराणीत खाद्य तयार करणे परवडणारे आणि आरोग्यदायी असते.
अंडी देणाऱ्या एका कोंबडीस दिवसाकाठी ११० ग्रॅम खाद्य लागते तर गावरान कोंबडीस १३० ते १५० ग्रॅम खाद्य लागते. मिश्रण करताना एक किलोच्या प्रमाणात बाकी घटक घ्यावे.
व्हिटॅमिन - ए,बी - २,डी - ३ आणि व्हिटॅमिन बी यांचे एकत्रित मिश्रण एक क्विंटल भरड धान्यास २० ग्रॅम लागते तसेच कॅल्शियम, लोह, मीठ, फॉसफरस, आयोडीन, सोडियम, पोटॅशियम, सेलेनियम, मॅग्नेशियम, मॅगनीज, झिंक आदी खनिजद्रव्ये मिसळावी.
हाडांची बळकटी आणि अन्नपचनासाठी कोंबड्यांना खनिजांची आवश्यकता असते. कोंबड्यांच्या आहारात खनिजांचा वापर योग्य प्रमाणात केल्यास पायांतील अशक्तपणा दूर होतो. हाडांची योग्य पद्धतीने वाढ होते, त्यांना बळकटी मिळते. शरीरास कॅल्शिअम, लोह, मीठ, फॉस्फरस, आयोडीन, तांबे, सोडिअम, पोटॅशिअम, सेलेनिअम, मॅग्नेशिअम, मॅंगेनिज, झिंक इत्यादी खनिजांची आवश्यकता असते.
जीवनसत्त्वामुळे कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते, उत्पादन वाढते. शरीर कार्यक्षम व तजेलदार राहण्यासाठी जीवनसत्त्वांचा उपयोग होतो.
सर्वांचे मिश्रण मिक्सरमध्ये किंवा कोरड्या फरशीवर फावड्याच्या साह्याने करावे. सुमारे ६/७ मिनिटे फावड्याने विविध प्रकारे हलवून मिश्रण एकजीव करून घ्यावे. यासर्वांचे प्रमाण डॉकटर किंवा अनुभवी व्यक्तीकडून माहिती करून घ्यावे.
---------
माहिती आणि संशोधन - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.