

एका सिद्ध वळूची विर्यमात्रा शास्त्रीय पद्ध्तीने संकलित करून वीर्याची शीत तापमानाला साठवणूक करून माजावर आलेल्या गायी-म्हशींच्या गर्भाशयात नळीद्वारे योग्य वेळी, योग्य ठिकाणी सोडणे, म्हणजे कृत्रिम रेतन(artificial Insemination).
हेही पाहा- गायी-म्हशींतील कृत्रिम रेतनाची योग्य वेळ
कृत्रिम रेतनामध्ये सिद्ध वळूची निवड करून वीर्य संकलन करून घ्यावे लागते. नैसर्गिक रेतनातून एका वेळी एकच गाय किंवा म्हैस गाभण राहू शकते. परंतु जातिवंत वळूपासून एकाच वेळी वीर्यसंकलन केल्यानंतर त्यापासून शेकडो रेतमात्रा तयार केल्या जातात. या रेतमात्रा माजावर आलेल्या गायी-म्हशींमध्ये (cow-buffalo) योग्य वेळी तज्ज्ञ पशुवैद्कामार्फात भरवून घेतल्या जातात. यामुळे वळू संगोपनाचा अतिरिक्त खर्च टाळता येतो.
हेही वाचा- कोणती कोंबडी देते सर्वात जास्त अंडी ?
माजावर (heat) आलेल्या गायी-म्हशींना वळूच्या शोधात दूरवर न्यावे लागत नाही. अपंग दुर्बल गाई-म्हशीमध्ये कृत्रिम रेतन करता येते. जनेनिन्द्रीयांचे आजार होण्याची शक्यता फार कमी होते.
हेही वाचा- कोण-कोणत्या कारणामुळं नासतं दूध ?
गायी-म्हशी बरोबर २१ दिवसांनी माजावर येत असतात. व्यायलेली जनावरे ४५ ते ६० दिवसांनी माजावर येत असतात. गायीचा माज १८ ते २४ तास असतो, तर म्हशींचा माज २४ ते ३० तासापर्यंत टिकतो.
माजाचा मध्य ते उत्तरार्ध या स्पष्ट माजाच्या कालावधीत कृत्रिम रेतन करून घ्यावे. साधारणपणे सकाळी माजावर आलेल्या गाई-म्हशींमध्ये सायंकाळी तर रात्री माजावर आलेल्या गाई-म्हशींमध्ये पहाटे कृत्रिम रेतन करून घ्यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.