

प्रथिनांचा (protein) उत्तम स्रोत म्हणून आपल्या आहारात माशांचा (fish) समावेश करत असतो. माशांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतात. त्यातही खाऱ्या पाण्यातील (salt water)मासे, गोड्या पाण्यातील मासे, निमखाऱ्या पाण्यातील मासे असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. काहींचा कल काटेरी मासे खाण्याकडे तर काहींचा कल बिनाकाट्याचे मासे खाण्याकडे असलेला दिसून येतो. माशांच्या प्रकारात इतकी विभिन्नता असली तरी काही लोकांचा कल हा माशांचे डोके (fish head) खाण्याकडे जास्त दिसून येतो.
माशांचे डोके खाण्याचे फायदे-
- ज्या लोकांना विस्मृतीचा आजार आहे, अशा लोकांसाठी माशाचे डोके चांगले असते.
- माशांच्या डोक्यात ओमेगा ३ फॅटी ॲसिडसारखे घटक असतात. ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
- आठवड्यातून किमान तीन वेळेस तुम्ही आहारात माशांचा समावेश केला पाहिजे.
- माशांच्या डोक्याने डोळ्या संबंधीच्या तक्रारी कमी होण्यास मदत होते.
- रातांधळेपणाचा आजार असलेल्या लोकांसाठी माशांचे डोके एक चांगला आहार असून शकतो.
- माशाच्या डोक्यातील गुणकारी घटकामुळे आपल्या शरीरातील घाण विरघळून बाहेर येण्यास मदत होते.
- ज्या लोकांमध्ये केस गळतीची समस्या दिसून येते अशा लोकांना डॉक्टर माशांचे डोके खाण्याचा सल्ला देतात.
- लकवा किंवा वाताची समस्या असणाऱ्या लोकांसाठीही माशाचे डोके खाणे फायद्याचे ठरते.
- माशाचा डोका माशांच्या इतर भागापेक्षा जास्त पौष्टिक असतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.