सानेन शेळीची वैशिष्ट्ये काय आहेत ?

आपल्याकडे शेळ्या प्रामुख्याने मांस उत्पादनासाठीच वापरल्या जातात. पण शेळ्यांच्या अशाही काही जाती आहेत ज्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. सानेन ही शेळीची अशी जात आहे जिला दुधाची राणी या नावाने संबोधले जाते.
What are the characterstics of sanen goat breed?
What are the characterstics of sanen goat breed?
Published on
Updated on

आपल्याकडे शेळ्या प्रामुख्याने मांस उत्पादनासाठीच वापरल्या जातात. पण शेळ्यांच्या अशाही काही जाती आहेत ज्या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. सानेन ही शेळीची अशी जात आहे जिला दुधाची राणी या नावाने संबोधले जाते. सानेन (sanen) ही जगातील चांगली विकसित झालेली, आणि इतर शेळ्यांच्या तुलनेत सर्वाधिक दुधाचे उत्पादन देणारी जात म्हणून ओळखली जाते. सानेन शेळीचे मूळ स्थान हे स्वित्झर्लंडच्या (switzerland ) सानेन खोऱ्यातील असल्याने तिला सानेन हे नाव पडले आहे. या जातीच्या कासेवर, कानावर आणि नाकावर काही वेळेस काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.  या शेळ्यांचे (goat) कान ताठ, मध्यम लांबीचे असतात. या शेळीचा चेहरा सरळ असतो.

हेही पाहा- बोअर शेळी संगोपनाकडे वाढता कल

पूर्ण वाढ झालेल्या नराचे वजन ९० किलो असते, तर मादीचे वजन ६५ किलो असते. या जातीच्या शेळीची जगभरात मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.  एका वर्षातील दूध उत्पादन ३०० ते २००० किलोपर्यंतच मिळते.  दुधातील फॅटचे प्रमाण ३.५ % तर प्रोटीनचे प्रमाण ३.४ % असते. या शेळ्या दिवसाला ४ ते ४.५ लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन देऊ शकतात.

सानेन शेळीची वैशिष्ट्ये

  • मुख्यतः सानेन शेळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात.
  • या शेळीच्या नाक, कान आणि कासेवर काहीवेळेस काळे डाग असू शकतात.
  • कान सरळ वरच्या दिशेने असतात.
  • या शेळ्यांना साधारणपणे शिंगे नसतात.
  • पाय लहान आकाराचे आणि मान लांब आकाराची असते.
  • कासेचा आकार खूप मोठा होतो.
  • शेळीचे संपूर्ण शरीर लहान आकाराच्या केसांनी झाकलेले असते.
  • ही शेळी इतर सर्व शेळ्यांच्या तुलनेत जास्त दुधाचे उत्पादन देते.
  • स्वित्झर्लंडमध्ये उगम असल्याने जास्त तापमान सहन करू शकत नाहीत.
  • एका प्रौढ नर सानेन शेळीचे वजन सुमारे ७०-९० किलो असते आणि प्रौढ मादी शेळीचे वजन हे ६५ ते ७० किलोपर्यंत असते.
  • या शेळीपासून मिळणारे दूध सर्व प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी योग्य आहे. 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com