

बोकड जर पैदाशीकरता वापरायचा नसेल तर त्याचे खच्चीकरण करणे फायद्याचे ठरते. शेळीपालन व्यवसायात शेळीपेक्षा बोकडाला अधिक मागणी असते. कळपातील खच्ची न केलेल्या बोकडामार्फत ज्याची पैदास आपल्याला नको असते, अशा बोकडापासून संकर होऊन पाटी गाभ जाण्याचा धोका संभवतो.
साधारणपणे बोकडाचे खच्चीकरण त्याचे वय कमी असतानाच करावे. कारण जसजसे बोकडाचे वय वाढत जाते तसतसे खच्ची करते वेळी त्याला तणाव निर्माण होऊन त्याचा त्याच्या वाढीवर परिणाम दिसून येतो. नर करडाचे वय तो २ ते ४ आठवड्याचा असताना जर तो पैदाशीसाठी वापरायचा नसेल तर अशा बोकडाचे खच्चीकरण करून घ्यावे.
हेही पाहा - पैदाशीसाठी बोकड - शेळी निवड
बोकडाचे खच्चीकरण करण्याच्या दोन पद्धती प्रामुख्याने वापरल्या जातात.
पहिली चिमटा पद्धत आणि दुसरी रबर बँड पद्धत. यात चिमटा पद्धत योग्य समजली जाते. चिमटा पद्धतीत बर्डीझो कॅस्ट्रेटर नावाचा चिमटा वापरला जातो.
खच्चीकरण केल्यामुळे बोकडाची वाढ जास्त चांगली होते. बोकडाचे खच्चीकरण केल्याने बोकड इतर शेळ्याच्या मागे न लागता, खाद्य खाण्याकडे जास्त लक्ष देतो. या बोकडाचे मांस अधिक रुचकर लागते. खच्ची केलेल्या बोकडाची कातडी सुधारते. मात्र खच्चीकरण तज्ज्ञ पशुवैदकामार्फतच करून घ्यावे. कमी दर्जाच्या बोकडा बरोबर पैदास होण्याचे टाळता येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.