पशुखाद्यातून जनावरांना द्या अझोला

पशुखाद्यावरील खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी कमीत कमी खर्चातील पर्याय म्हणजे अझोला. अझोलाचे उत्पादन घरच्या घरी अगदी कमी खर्चात करता येते. चारा टंचाई किंवा कमतरतेच्या काळात अझोलाचा वापर जनावरांसाठी पूरक खाद्य म्हणून करणे फायदेशीर ठरते.
Use of Azolla in Animal Diet will Overcome Feed Deficiency.
Use of Azolla in Animal Diet will Overcome Feed Deficiency.
Published on
Updated on

अझोला हे पाण्यात मुक्तपणे वाढणारी वनस्पती आहे. अझोला संयुक्तपणे वातावरणातील नत्र स्थिरीकरणाचे काम करतो. अझोलामध्ये तरंगत्या रूपांतरीत खोडासहीत द्विद्लीय लहान पाने आणि मुळांचा समावेश होतो.

अझोलातील पोषक घटक

प्रथिने – २५ ते ३० %

खनिजे – १० ते १५ %

अमिनो आम्ल – ७ ते १० %

अझोला मध्ये “लीग्निन” असल्याने जनावरांना पचण्यास सुलभ असते.

अझोला उत्पादनासाठी आवश्यक 

  • अझोला (Azolla) उत्पादनासाठी ५० % सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. पूर्ण प्रकाश किंवा पूर्ण अंधार हानीकारक असतो. नियंत्रित सूर्यप्रकाशासाठी शेड नेटचा वापर करावा.
  • अझोलाच्या वाढीसाठी २० ते २७ अंश से. तापमान योग्य आहे.
  • अझोलाच्या चांगल्या वाढीसाठी पाण्याचा सामू (pH) ५.५ ते ७.५ असणे आवश्यक असते.
  • खड्यातील अझोला दररोज किंवा एक दिवसाआड काढावा, ज्यामुळे खड्यात अझोलाची दा़टी होणार नाही.
  • आद्रतेचे प्रमाण ६० ते ८० % असल्यास अझोलाची वाढ चांगली होते.
  • सुरुवातीचे १५ दिवस अझोला व पशुखाद्याचे समप्रमाणात मिश्रण करून खाऊ घालावे.
  • पशुखाद्य म्हणून अझोलाचा वापर गायी, म्हशी, वराह आणि कोंबड्यासाठी करता येतो.
  • दुभत्या जनावरांना दररोज एक ते दीड किलो अझोला चारल्यास दूध उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ संभावते व जनावरांची पचनक्षमता देखील सुधारते.
  • महाराष्ट्रात प्रामुख्याने भातशेतीमध्ये अझोलाचा वापर जैविक खत (Green Manure) म्हणून केला जातो. अझोला  हेक्टरी ४०-६० किलो नत्र स्थिरीकरण करते. अझोला हे हिरवळीच्या खतांबरोबरच दुभती जनावरे, वराह आणि बदकांसाठीही उपयुक्त खाद्य आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com