पिल्लांच्या शरीराचे तापमान (chick body temperature) ४१ ते ४२ अंश सेल्सिअस असते. सुरुवातीला पिल्लांच्या (chicks) शरीरावर जास्त पिसे नसल्याने, पिल्ले वातावरणातील बदलाला लवकर बळी पडतात. असं होऊ नये म्हणून त्यांना सुरुवातीचे काही दिवस कृत्रिम ऊब (artificial heat) द्यावी लागते. सुरुवातीचे २ ते ३ आठवडे ब्रूडिंग (brooding) व्यवस्थापन चांगले असावे लागते. कारण ब्रूडिंग व्यवस्थापनावरच पिल्लांची पुढील वाढ अवलंबून असते. बदलत्या वातावरणानुसार ऊब देण्याचा कालावधी कमी जास्त होत असतो.
ऊब देण्यासाठी ज्या उपकरणांचा वापर केला जातो, त्याला आपण ब्रूडर (brooder) म्हणतो. हे ब्रूडर जमिनीपासून २ ते ३ फूट उंचीवर ठेवावेत. गरजेनुसार त्यांची उंची कमी-जास्त करावी. हे करीत असताना ब्रूडरचा स्पर्श पिल्लांना होणार नाही, याची मात्र काळजी घ्यावी. ब्रूडरमधील तापमान पक्षांच्या वयानुसार बदलत असते.
- पहिल्या आठवड्यातील तापमान ९५ डिग्री फॅरेनहाईट
- दुसरा आठवड्यातील तापमान हे ९० डिग्री फॅरेनहाईट
- तिसऱ्या आठवड्यातील तापमान त्याहून कमी म्हणजे ८५ डिग्री फॅरेनहाईट असावे लागते.
दर सात दिवसांनी ब्रूडरचे तापमान साधारणतः ५ डिग्री फॅरेनहाईटने कमी करावे लागते. ब्रूडिंगसाठी आपण विजेचे बल्ब वापरू शकतो.
ब्रूडर द्वारे कृत्रिम ऊब देत असताना ती योग्य प्रमाणात दिली जातीय की नाही याची शहानिशा करण्यासाठी पिल्लांचे बारीक निरीक्षण करावे. उपलब्ध जागेमध्ये पिल्ले समप्रमाणात विखुरलेली असतील तर, कृत्रिम ऊब योग्य प्रमाणात दिली जातीय असं समजावे. पिल्ले एकाच ठिकाणी जमा होत असतील, तर दिली जाणारी उष्णता कमी पडतीय असं समजावं. याउलट पिल्ले बल्बपासून दूरवर जास्त असल्यास, कृत्रिम ऊब जास्त दिली जातीय, असं समजावं आणि ती कमी करावी. सर्वसाधारणपणे एक पिल्लाला २ वॅट इतक्या उष्णतेची गरज असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.