चिंचेला प्रतिक्विंटल सरासरी १०७५० रुपये दर

नगरमध्ये दररोज दीड हजार क्विंटल आवक
Tamarind
Tamarind Agrowon
Published on
Updated on

नगर: गतवर्षीपेक्षा यंदा चिंचेचे (Tamarind Production) उत्पादन चांगले निघाले असून नगर येथील बाजार समितीत दर दिवसाला सध्या साधारणपणे दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. यंदा दर आणि आवक सध्या स्थिर आहे. बुधवारी (ता. ६) चिंचेला ६५०० ते १५ हजार व सरासरी १०७५० रुपये प्रतिक्विटंल दर मिळाला आहे. गेल्यावर्षी चिंचेला साधारणपणे २१ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
नगरसह शेजारच्या बीड, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, जळगाव व पुणे जिल्ह्यांतील काही भागांत चिंचेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. बांधावरील पीक म्हणूनही चिंचेकडे (Tamarind Production) पाहिले जात आहे. उन्हाळ्यात चिंचेतून अनेक महिलांना रोजगारही (Women Employment) मिळत आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत या भागातून चिंचेची आवक होत असते.
यंदा गतवर्षीच्या चिंचेचे चांगला उत्पादन निघाल्याचा अंदाज आहे. सध्या येथील बाजार समितीत (market committee )फोडलेल्या चिंचेची साधारणपणे दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

Tamarind
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेती

फोडलेल्या चिंचेला प्रतिक्विंटल ६५०० ते १५ हजार व सरासरी १०७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.
शिवाय बोटूक चिंचेला २९०० ते ३२६० रुपये व सरासरी ३०८० रुपये दर मिळत असून, बोटूक चिंचेची ३०० ते ४०० क्विटंलपर्यंत आवक होत आहे. चिंचोक्याचीही २५० ते ३०० क्विंटलची आवक होत असून, १४५० ते १५०० रुपये व सरासरी पावणेपंधराशे रुपयांचा दर मिळत आहे. नगर येथील देशभरासह परदेशातही चिंचेची निर्यात(Tamarind Export) होत आहे. गेल्या वर्षी चिंचेला २१ हजार रुपयांपर्यंत जास्तीत दर मिळाला होता आणि आवकही साधारणपणे पन्नास ते साठ हजार क्विंटलची झाली होती.

दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून चिंचेची आवक वाढली आहे. यंदा उत्पादन वाढल्याने आवक चांगली असून दरही चांगला आहे. सरासरी गतवर्षीएवढी उलाढाल होण्याचा यंदा अंदाज आहे.

- अभय भिसे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com