समुद्री शेवाळ संवर्धन प्रकल्प रत्नागिरीत सुरू

काळबादेवी, गोळप, मिऱ्या, भाट्ये तसेच काळबादेवी या चार समुद्रकिनाऱ्यांचा प्रकल्पात समावेश आहे.
Seaweed
Seaweed Agrowon
Published on
Updated on

रत्नागिरी : समुद्री शेवाळ संवर्धन प्रकल्प रत्नागिरी तालुक्यात नुकताच सुरू करण्यात आला आहे. काळबादेवी आणि गोळप येथे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. काळबादेवी, गोळप, मिऱ्या, भाट्ये तसेच काळबादेवी या चार समुद्रकिनाऱ्यांचा ( Sea beaches) प्रकल्पात समावेश आहे. पंतप्रधान मत्स्य संवर्धन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पातून उत्पादित होणाऱ्या शेवाळ (Moss) उत्पादनातून कॉस्मेटिक आणि जेली चॉकलेट तयार केली जाणार आहेत. प्रकल्पातून २०० स्थानिक महिलांच्या हाताला रोजगारही (Women Employment) उपलब्ध झाला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यातील पहिला, तर देशातील दुसरा क्रमाकांचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.

Seaweed
आता कापूस आयात करण्याची मागणी!

हा प्रकल्प काही कालावधीत पूर्णत्वाला जाणार असून, या माध्यमातून आणखीन शेकडो हातांना काम मिळणार आहे. याअंतर्गत ‘कप्पा पिकस’ या जातीचे शेवाळाचे उत्पादन (Moss Production) आता काळबादेवी आणि मिऱ्या या ठिकाणी घेतले जात आहे. यापासून कॉस्मेटिक, जेली चॉकलेट उत्पादन होणार आहे. खत म्हणूनही याचा वापर केला जाणार असल्याचेही डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले.

लोकसंचलित साधन केंद्र रत्नागिरी यांच्यामार्फत जिल्हा आर्थिक विकास महामंडळाने या संदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला होता. यासाठी समन्वय अधिकारी जगन्नाथ वानखेडकर, सहायक अमरिश मेस्त्री यांना मत्स्य महाविद्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, इंडियन अ‍ॅग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट कोची व मत्स्य महाविद्यालय, आयसीएआर (ICAR) अंतर्गत सीएमएफआरआय (CMFRI) यांनी तांत्रिक सहकार्य केले आहे. केंद्रीय समुद्र मत्स्य संशोधन, मुंबई (Mumbai) यांनी यासाठी रत्नागिरी येऊन स्थानिक २०० महिलांना प्रशिक्षण दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com