Bioflock Fishery : शाश्‍वत मत्स्य उत्पादनासाठी पाण्याची पुनर्चक्रीकरण यंत्रणा

ग्राहक म्हणून माशांची किंवा एखाद्या उत्पादनाची खरेदी करताना सामान्यतः त्यांच्या बाह्य रूप, पोत, चव आणि त्यातील पोषक घटकांचा विचार केला जातो. अर्थात, प्रत्येकाची त्यातील प्राथमिकता वेगळी असू शकते. शेतकरी किंवा पुरवठादार आपल्या शेतीमाल बाजारपेठेमध्ये पाठवतानाही या सर्व घटकांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतो.
 Fishery
FisheryAgrowon

ग्राहक म्हणून माशांची किंवा एखाद्या उत्पादनाची खरेदी करताना सामान्यतः त्यांच्या बाह्य रूप, पोत, चव आणि त्यातील पोषक घटकांचा विचार केला जातो. अर्थात, प्रत्येकाची त्यातील प्राथमिकता वेगळी असू शकते.

शेतकरी किंवा पुरवठादार आपल्या शेतीमाल बाजारपेठेमध्ये (Market) पाठवतानाही या सर्व घटकांचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र या प्रक्रियेमध्ये आपल्या शेती, पशुपालन किंवा मत्स्यपालनाच्या (Fishery) पद्धतींचा पर्यावरणावरील परिणामांचा विचार फारसा केला जात नाही.

मात्र विकसित देशांमध्ये कोणत्याही उत्पादनाचे पर्यावरणावर होणारे परिणाम हे कमीत कमी राहतील, याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे यासाठी निकष अधिक कडक करण्यात आलेले आहेत.

 Fishery
शाश्‍वत टोमॅटो उत्पादनासाठी प्रयत्न

पश्‍चिम व्हर्जिनिया येथील ‘दि कॉन्झर्वेशन फंड फ्रेश वॉटर इन्स्टिट्यूट’ (TCFFI) ही संस्था मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची उत्तम आणि शाश्‍वत पद्धती (गुड अॅण्ड सस्टेनेबल मेथड्स) विकसित करण्यासाठी कार्यरत आहे.

शास्त्रज्ञांनी विकसित केलेली एक पद्धत म्हणजे रिसर्क्यूलेटिंग अक्वाकल्चर सिस्टिम्स (RAS).

 Fishery
Fishery : मत्स्यपालनातील व्यावसायिक संधी...

ही पद्धत मासे आणि अन्य जलचरांच्या पालनामध्ये अत्यंत महत्त्वाची ठरणारी पद्धत असून, तिची लोकप्रियता वाढत आहे.

कारण यामुळे मत्स्यपालनातील (अॅटलांटिक सॅलमोन) पाण्याचा पुनर्वापर अधिक कार्यक्षमपणे करता येतो. तसेच ती तलावामध्ये कोणत्याही ठिकाणी बसवणे शक्य आहे. त्यामुळे स्थानिक तलावाच्या आकारानुसार व्यवस्थापन करणे सोपे होते.

त्याविषयी माहिती देताना प्रकल्पाचे राष्ट्रीय कार्यक्रम प्रमुख कैर्ड रेक्सरॉड (तिसरे) यांनी सांगितले, की मत्स्यपालनातील पाण्याच्या पुनर्चक्रीकरणामध्ये माशांच्या वाढीसाठी पाण्याचा वापर, त्यावर प्रक्रिया आणि त्यात वाढलेले टाकाऊ घटक बाजूला करणे आणि पुन्हा पाण्याचा दर्जा चांगला झाल्यानंतर मासेपालनामध्ये वापर करणे यावर भर दिला जातो.

यामध्ये पाण्याचा अत्यंत कार्यक्षम वापर करतानाच त्यातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या टाकाऊ पाण्यामुळे पर्यावरणातील अन्य पाणी स्रोतांचे नुकसान होणार नाही, याकडेही लक्ष देणे गरजेचे असते. या साऱ्या बाबींवर या तंत्रज्ञानामध्ये भर देण्यात आलेला आहे.

 Fishery
मत्स्य संवर्धनाच्या विविध पद्धती

रास पद्धतीचा अवलंब केल्यास होणारे फायदे
   माशांची वाढ करण्यायोग्य वातावरण तलावामध्ये नियंत्रित करणे सोपे होते.
   पाण्याच्या गुणवत्ता टिकवून ठेवणे शक्य होते. त्यासाठी पाण्यातील माशांची विष्ठा व टाकाऊ पदार्थ गोळा करणे, बाजूला काढले जातात.

तसेच पाण्यामध्ये विरघळलेली अनावश्यक आणि आरोग्याला हानिकारक घटक वेळीच दूर केले जातात.
   

पूर्ण पाणी सोडून देण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा यामध्ये पाणी वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी राहते. फक्त पाण्यातील टाकाऊ घटक दूर केले जातात. त्स्यसंवर्धनासाठी अत्यंत कमी पाणी लागते.
 

खूप फायदे असले तरी मत्स्यपालकांच्या अडचणी लक्षात घेताना रास प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जात आहेत.

माशांना लवकर येणारी लैंगिक पक्वता अडचणीची...
अभ्यासामध्ये संशोधकांना काही सॅलमोन माशांनी लवकर लैंगिक पक्वता मिळविल्याचे लक्षात आले. विशेषतः ही स्थिती लवकर गाठल्यानंतर त्यांच्या खाद्याचे वजनामध्ये रूपांतर करण्याची क्षमता घटत असल्याचे दिसून आले.

परिणामी माशांच्या वाढीसाठी अधिक खाद्य द्यावे लागत होते. त्याविषयी माहिती देताना रेक्सरोड यांनी सांगितले, की माशांच्या वाढीच्या चक्रामध्ये पिलांच्या वाढीचा आलेख (juvenile growth curve) हा अधिक चांगला मानला जातो.

या काळात त्यांची कमी खाद्यावर वेगाने वाढ होत असते. हा आलेख तसाच सुरू राहणे हे मस्त्यशेतीच्या कार्यक्षमतेच्या आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

लवकर लैंगिक पक्वता ही प्रामुख्याने नर माशामध्ये दिसून येते. यामागे जनुकीय गुणधर्म, पाण्याचे तापमान, त्यांना मिळणाऱ्या दिवसाच्या प्रकाशाच्या कालावधीचे प्रमाण (फोटोपिरीयड) आणि माशाचे लिंग अशा अनेक घटकांचा परिणाम होतो.

या साऱ्या घटकांमुळे माशांच्या पुनरुत्पादनाच्या साखळीवरही परिणाम होतो. त्यामुळे व्यवस्थापन पद्धतीतून या घटकांचे योग्य प्रकारे नियंत्रण केल्यास लवकर येणारी लैंगिक पक्वता रोखता येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

पाण्याचे तापमान कमी करणे, प्रकाशाचा कालावधी कमी करणे या सारख्या बाबी आपण रास प्रणालीमधून व्यवस्थापनाच्या माध्यमातून सुधारू शकतो.

मत्स्यपालन पद्धतीतील पाण्याच्या पुनर्चक्रीकरणासाठीची यंत्रणा. पाण्याचा मूलभूत प्रवाह आणि पाण्यावरील प्रक्रियेची साखळी अशा प्रकारे असते.
(स्रोत ः जॉन डेव्हिडसन)

१) मत्स्य उत्पादन टाकी  
२) विष्ठा आणि घन टाकाऊ पदार्थ काढणे  
३) पंपिंग  
४) नायट्रिफिकेशन  
५) हानिकारक वायू काढून टाकणे, ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि निर्जंतुकीकरण

माशांना येणाऱ्या मातकट वासाची समस्या
जॉन डेव्हिडसन यांनी सांगितले, की संस्थेमध्ये गेल्या तीन दशकापासून सॅलमोन माशांच्या विविध प्रजाती उदा. रेन्बो ट्राऊट आणि अलीकडे ॲटलांटिक सॅलमोन यांच्या वाढीसंदर्भात संशोधन आणि अभ्यास केला जात आहे.

त्यातून पर्यावरणाच्या विविध बाबींच्या त्यांच्या वाढीच्या प्रक्रियेवर होणारे परिणाम तपासले जात आहेत. त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षानुसार अधिक कार्यक्षम अशा पद्धती विकसित केल्या जात आहेत.

पाण्याचा अपव्ययही कमी करणे शक्य होत आहे. मासे लवकर पक्व झाले की ग्राहकांच्या दृष्टीनेही त्यांचा दर्जा घसरतो.

विशेषतः त्याचा स्वाद कमी होतो. ॲटलांटिक सॅलमोन माशांना काही वेळेला एक प्रकारची मातकट किंवा कुबट वास येतो.

हा माशांमध्ये येणारा मातकट वास कमी करण्याच्या दृष्टीने एक दशकापेक्षा अधिक काळापासून संशोधन केले जात आहे. त्यातूनच त्यांनी एक प्रक्रिया विकसित केली. (त्याला इंग्रजीमध्ये depuration म्हणतात.) त्यामुळे ही समस्या मत्स्य उत्पादनामधून संपूर्णपणे दूर करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे.

सध्या अमेरिकी कृषी संशोधन सेवा आणि TCFFI एकत्रितरीत्या मत्स्यपालनासाठी अधिक योग्य असे वातावरण तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. त्यातून शेतकऱ्यांना मत्स्यपालनासाठी आवश्यक त्या शिफारशी आणि व्यवस्थापन पद्धती उपलब्ध होण्यास मदत होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com