खरीप पिकांची लागवड करण्यापूर्वी या गोष्टी करा

खरीप हंगामात पिकांची लागवड करताना, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार पाहूनच पिकाची निवड करावी.
 खरीप पिक लागवड
खरीप पिक लागवडAgrowon
Published on
Updated on

खरीप हंगामात (kharif season) पिकांची लागवड करताना, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार पाहूनच पिकाची निवड करावी. शेतकऱ्यांनी खरीपाची तयारी करताना माती परीक्षण, पूर्व मशागत, पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन यांचा विचार करूनच खरीपातील पिकांचे नियोजन केले पाहिजे.

पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता (soil fertility) महत्त्वाची ठरते. पावसाळ्याच्या आधी खरीपाची लागवड करण्याआधी जमिनीचा पोत माहित असणे गरजेचं आहे. कारण त्यानुसार खतांची मात्रा देणे सोयीस्कर बनते. माती परीक्षण केल्याने जमिनीचा सामू कळून, रिपोर्टनुसार जमिनीतील पिकांना अन्नद्रव्यांची मात्रा देता येते. यासोबतच खतांचा अतिरिक्त वापर कमी होऊन, खर्चातही बचत होते.

जमिनीची पूर्व मशागत- पिकांची वाढ चांगली होण्यासाठी मुळे खोलवर जमिनीत गेली पाहिजेत. यासाठी दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन खोल नांगरणी करून घ्यावी. खोल नांगरट केल्याने किडींची अंडी, कोष वरच्या थरावर येऊन नष्ट होण्यास मदत होते.

शेतातील ज्या जागेमध्ये पाणी जास्त प्रमाणात मुरते. अशा ठिकाणी उताराला आडवे वाफे तयार करून घ्यावेत. खरीप हंगामात वाफे तयार करताना आडवे ६० मीटर अंतरावर उतारास आडवे वाफे तयार करावेत. या वाफ्यांमुळे पाणी वाहून न जाता जागीच मुरण्यास मदत होते.

 खरीप पिक लागवड
गाय आटवताना घ्यायची काळजी

मध्यम ते भारी प्रकारच्या जमिनीत लोखंडी नांगराचा वापर करून उतारास आडवे सऱ्या तयार करून घ्याव्यात. पावसाचे पडणारे पाणी सऱ्यातून जमिनीत मुरते. उताराची लांबी कमी होऊन पाणी जमिनीत मुरते.

आपल्याकडे पडणाऱ्या पावसापैकी ८० टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो. मोसमी पाऊस जमिनीत जिरविण्यासाठी जमिनीच्या उताराला ४ ते ६ इंचाच्या खोल सऱ्या पाडाव्यात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com