भारताच्या दूध, अंडी उत्पादनात वाढ

कोरोना महामारीनंतरच्या काळात देशातील दूध आणि अंड्याचं उत्पादन वाढलं आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी लोकसभेत उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.
India's milk and egg production has increased in post covid situation
India's milk and egg production has increased in post covid situation
Published on
Updated on

कोरोना महामारीनंतरच्या काळात देशातील दूध आणि अंड्याचं उत्पादन वाढलं आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला (Purshottm Rupala)  यांनी लोकसभेत उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे. हेही वाचा- या कोंबडीच्या जातीपासून मिळते सर्वात जास्त अंडी उत्पादन

फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन कॉर्पोरेट स्टॅटीस्टिकल डाटाबेसच्या (FAOSTAT) आकडेवारीचा आधार घेत रुपाला यांनी, दूध उत्पादनात (Milk production) भारत (India) प्रथम क्रमांकावर असून अंडी उत्पादन (egg production) आणि मस्त्य उत्पादनात (Fishery) तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले आहे. २०२०-२०२१ साली भारताच्या अंडी उत्पादनात ६.७ टक्क्यांची तर दूध उत्पादनात ५.८१ टक्क्यांची वाढ झाली आहे. हेही वाचा- कुक्कुटपालनासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे अर्धबंदिस्त मॉडेल जागतिक स्तरावर भारताचा अंडी उत्पादनातील वाटा ७ टक्के होता. २०१९-२०२० दरम्यान भारताचे अंडी उत्पादन ११४.३८ अब्ज होते. २०२०-२१ मध्ये भारताचे अंडी उत्पादन १२२.०४ अब्ज होते. २०१८-२०१९ दरम्यान भारताचे अंडी उत्पादन १०३.८० अब्ज होते. हेही वाचा- प्रौढ जनावरांना श्वसन रोगावर उपचारासाठी द्या या वनस्पती २०१९-२० मध्ये भारताचे दूध उत्पादन १९८.४४ दशलक्ष टन होते. २०२०-२१ मध्ये ५. ८१ टक्के वाढीसह दूध उत्पादन २०९.९६ दशलक्ष टनांवर गेले. जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा २१ टक्के असल्याचे रुपाला म्हणाले आहेत. पशुधन (Livestock) हा कृषी क्षेत्रातील सर्वाधिक वेगाने वाढ होणारा उप विभाग आहे. २०१४-२०१५ ते २०२०-२०२१ दरम्यान पशुधन विकास क्षेत्राची वार्षिक वाढ ७.९३ टक्के राहिली आहे.   कृषी आणि संलग्न क्षेत्रातील एकूण मूल्यवृद्धीच्या तुलनेत पशुधन क्षेत्रातील वाढ २०१४-२०१५ दरम्यान २४. ३८ टक्क्यांवर होती. २०२०-२०२१ साली ते प्रमाण ३०.३७ टक्क्यांवर गेल्याचे रुपाला यांनी लोकसभेत सांगितले.   पशुधन व्यापारातील भारताचे योगदान स्पष्ट करताना रुपाला यांनी, २०२०-२०२१ दरम्यान भारताने ४४९ अब्ज रुपये पशुधन उत्पादनांची निर्यात केली असून जी, देशाच्या एकूण निर्यातीच्या २. १ टक्के भारत असल्याचं नमूद केलं आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com