पूर्ण वाढ झालेल्या जनावरास संतुलित आहारानुसार त्याच्या आहारात हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्य असावे लागते. सर्वसाधारणपणे २० ते २५ किलो हिरवा चारा त्यातही निम्मा एकद्ल आणि द्विदल असावा लागतो. ५ ते ७ किलो कोरडा चारा, १.५ ते २ किलो खुराक, २० ग्रॅम खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे. यासोबतच जनावरांना ५० ते ६० लिटर स्वच्छ, निर्जंतुक पाण्याची गरज असते. हे प्रमाण जनावराच्या वजनानुसार, शारीरिक अवस्थेनुसार कमी-जास्त होत असते. तसेच जनावरांचे चारा खाण्याचे आणि पाणी पिण्याचे प्रमाण ते वातावरणातील बदलानुसारही बदलत असते.
पशुपालन व्यवसायात ६० ते ७० टक्के खर्च हा चारा आणि पशुखाद्यावर होत असतो. नियोजनपूर्वक चाऱ्याची लागवड केल्यास वर्षभर जनावरांना हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता येईल. चारा विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि खर्चातही बचत होईल.
सध्या उपलब्ध असलेल्या हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवून घ्यावा. हा मुरघास उन्हाळ्यात जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वापरू शकतो. सोबतच जमिनीत पिक नसल्याने दुसऱ्या चारा पिकाची लागवड करू शकतो. हे पिक निवडताना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांच्या जातीचा वापर करावा.
अतिरिक्त चाऱ्याचे उत्पादन पाण्याची सोय असल्यास हायड्रोपोनिक पद्धतीचा वापर करून घेऊ शकतो. हायड्रोपोनिक पद्धतीमध्ये पाण्यातून पिकांना आवश्यक मुलद्रव्याचा पुरवठा करून उत्पादन घेतलले जाते.
पाण्यात तरंगत वाढणाऱ्या अझोलाचा वापरही जनावरांच्या पशुखाद्यात करू शकतो. अझोलाची वाढ कमी वेळात जास्त होते. अझोलाचा वापर केल्यास पशुखाद्यातही बचत होते. खरीप व रब्बी हंगामातील पिकांच्या अवशेषांवर म्हणजे कडबा, भुसा यांवर प्रक्रिया करून त्यांचे पोषणमुल्ये वाढवू शकतो. अशा घटकांचा वापर आपण जनावरांच्या आहारातही करू शकतो.
उसाची कुट्टी करून ती जनावरांना चारा म्हणून द्यावी. उसाच्या वाढयावर प्रक्रिया करून ते जनावरांना द्यावेत. जनावरांच्या आहारात नियमितपणे ३० ग्रॅम खनिज मिश्रणांचा समावेश करावा. गोठ्यात खनिज मिश्रणांची चाटण वीट टांगून ठेवावी. चारा टंचाईच्या काळात जनावरांना शेळ्या-मेंढ्यांना अंजन, सुबाभुळ, कडुलिंब या झाडांचा पाला देता येऊ शकतो.
उन्हाळ्यात पिकांची पाण्याची गरज वाढते आणि पाण्याची उपलब्धता देखील कमी होते. या दोन्ही गोष्टींचा विचार करून उन्हाळ्यात एकूण किती क्षेत्रावर लागवड करावी त्याचे नियोजन करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.