कंपोस्ट खत कसे तयार करावे ?

घरातील, बागेतील टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा वापर करून घरच्या घरी कंपोस्ट खत निर्मिती करा.
How to make Compost
How to make CompostAgrowon

कंपोस्ट खत (compost) निर्मितीसाठी झाडांचा पालापाचोळा, शेतातील तसेच गोठ्यातील काडीकचरा, बजारातील टाकाऊ पदार्थ, पिकांची धसकटे, भुसा, भाज्यांचे टाकाऊ भाग, पाने, देठ, गवत, किचनमधील उरलेले घटक यांसारख्या टाकाऊ पदार्थांचा वापर करू शकतो.

खड्डयामध्ये कंपोस्ट बनविताना वरीलप्रमाणे सर्व गोष्टी एकत्र करून घ्याव्यात. कंपोस्टसाठी खड्डा खणताना तो शक्यतो उंचावर खणून घ्यावा. खड्ड्याची खोली तीन फुटापर्यंत असावी. रुंदी सहा फूट आणि लांबी ही गरजेनुसार ठेवावी.

How to make Compost
शेततळ्यातील योग्य खत व्यवस्थापन | Fertilizer Management of Fish Pond

कंपोस्ट बनविण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या सेंद्रिय गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारच्या तारा, लोखंडी वस्तू, काचांचे तुकडे, प्लॉस्टिकच्या पिशव्या यांसारखे न कुजणारे टाकाऊ पदार्थ काढून टाकावेत. खड्डा भरत असताना प्रथम १० ते १५ सेंटीमीटर जाडीचा लहान-लहान सेंद्रिय पदार्थांचा थर समप्रमाणात टाकावा. यावर शेणाची स्लरी करून पसरवून घ्यावी. असे थर आलटून पालटून खड्डा भरेपर्यंत द्यावेत. शेणाची स्लरी बनवताना प्रति टन सेंद्रिय पदार्थामध्ये अर्धा टन याप्रमाणात कंपोस्ट कल्चर मिक्स करावे. कंपोस्ट बनविताना जुन्या कुजलेल्या शेणखताचा वापर केल्यास बाकीचे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजण्यास मदत होते. खड्डा भरताना जनावरांचे मुत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण आणि कचरा यांच्या प्रत्येक थरावर शिंपडत राहावे. आलटून पालटून एकावर एक थर दिल्यानंतर, जमिनीच्या एक ते दोन फूट उंचीवर आल्यानंतर थर देणे बंद करावे. शेवटी ओल्या मातीने सारवून घ्यावा.

How to make Compost
नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती

या पद्धतीने ४ ते ५ महिन्यांनी चांगल्या प्रतीचे कंपोस्ट तयार होते. खड्ड्यातील थर दर १५ दिवसांनी किंवा महिन्यांनी उलटे पालटे केल्यास कुजण्याची क्रिया लवकर संपते. प्रत्येक वेळी थर वर खाली केल्यानंतर मातीने लिंपून घ्यावेत. साधारणपणे १० फूट लांब, सहा फूट रुंद आणि तीन फूट खोल आकाराच्या खड्ड्यातून २.५ ते ३ क्विंटलपर्यंत कंपोस्ट मिळते. कंपोस्टसाठी खड्डा भरताना तो एकदाच भरावा अशी मर्यादा नसते. जस-जसे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होत जातील, तसा खड्डा भरून घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com