Animal care
Animal careAgrowon

Animal Care : पावसाळ्यात जनावरांच्या आजारावर कसं नियंत्रण ठेवाल?

Animal Diseases : पावसाळ्यात वातावरण हे हानिकारक जिवाणूंसाठी अनुकूल असते. या वातावरणाचा गाई, म्हशींच्या दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो.
Published on

डॉ. गणेश जगताप, डॉ. प्रेरणा घोरपडे

Animal Husbandry : पावसाळ्यात वातावरण हे हानिकारक जिवाणूंसाठी अनुकूल असते. या वातावरणाचा गाई, म्हशींच्या दूध उत्पादन क्षमतेवर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन व्यवस्थापनात काही बदल करावे लागतात. गोठ्यातील वातावरण स्वच्छ कोरडे ठेवल्यास आजाराचा संसर्ग टाळता येतो.

गोठ्याच्या छतातून पाणी गळण्यामुळे जनावरे स्थिर व आरामात राहू शकत नाहीत. या समस्येमुळे कॉक्सिडिऑसिस यांसारखा गंभीर आजार जनावरांना होतो. जमिनीतील ओलाव्यामुळे विविध जिवाणू वाढून आजाराचा प्रसार होतो. विविध प्रकारचे कृमी, कीटकसुद्धा वाढतात.

पावसाळ्यात गोचिडांची संख्या ही झपाट्याने वाढते. गोचीड अंगावर बसून रक्त शोषून विविध प्रकारचे आजार पसरवतात. उदा. गोचीड ताप. या आजारामुळे जनावरांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो.

पावसाळ्यात गोठ्यात दलदल झाल्याने कासेचा आजार होतो.

जनावरांच्या खुरे आणि तोंड यामध्ये वेगाने पसरणाऱ्या विषाणूमुळे लाळ्या खुरकूत हा आजार होतो. यामुळे जनावरांच्या दूध उत्पादन आणि कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

उपाययोजना

आजारी जनावराला इतर निरोगी जनावरांपासून दूर ठेवावे.

पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण करून नियमित उपचार करावेत.

आजारी जनावराला ठेवलेल्या ठिकाणी ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी.

जनावरांना पावसात भिजलेला ओला चारा खाण्यासाठी देऊ नये.

ओले गवत मऊ असल्याने जनावरे ते कमी वेळेत अधिक प्रमाणात खातात. परंतु त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आणि तंतुमय पदार्थ कमी असल्याने जनावरांची पचनक्रिया बिघडून त्यांना अतिसार होतात. त्यामुळे जनावरांसाठी देण्यात येणारे पशुखाद्य किंवा सुका चारा हा कोरडा राहील याची दक्षता घ्यावे.

Animal care
Animal Care : जनावरांच्या आजारावर उपयुक्त वनौषधी

जनावरांना पाऊस किंवा वीज पडत असताना झाडाखाली घेऊन थांबू नये. जवळपास निवारा असल्यास त्या ठिकाणी थांबावे.

पावसाळ्यात सुरुवातीला बागायती क्षेत्रात फुली गवत मोठ्या प्रमाणात आढळून येते.

जनावरांच्या आहारात फुलीचे गवत आल्यास त्यांना विषबाधा होते. कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरे दगावतात.

जंतनाशक वेळापत्रक

गोल कृमी : पहिला डोस जन्मल्यानंतर ३ दिवसांनी व त्यानंतर सहा महिन्यांपर्यंत प्रत्येक महिन्याला सहा महिन्यांवरील जनावरात वर्षातून तीन वेळा.

पर्ण कृमी : बाधित भागात वर्षातून दोन वेळा.

चपट कृमी : वर्षातून दोन वेळा (जानेवारी व जून) बाधित कळपातील वासरांना

Animal care
Animal Care : कासदाह आजारावर घरच्याघरी उपचार कसे कराल?

लसीकरण वेळापत्रक

लाळ्या खुरकूत ः वर्षातून दोन वेळा सप्टेंबर व मार्चमध्ये

घटसर्प ः पावसाळ्यापूर्वी मे / जूनमध्ये (संक्रमित भागात दोन वेळा)

फऱ्या : पावसाळ्यापूर्वी मे / जूनमध्ये (संक्रमित भागात दोन वेळा)

काळपुळी : फक्त संक्रमित भागामध्ये मे ते जून दरम्यान.

संसर्गजन्य गर्भपात ः ४ ते ८ महिन्यांमधील फक्त मादी वासरांना आयुष्यात एकदा.

गोचीड ताप ः तीन वर्षांतून एकदा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com