

एका पैदाशीच्या बोकडाकरिता गोठ्यात ३.४ चौ.मी. एवढी जागा लागते, शक्यतो गोठ्यातील एका कप्प्यात एक बोकड ठेवण्याकरिता वेगळी जागा असावी. गोठा कोरडा असावा, गोठ्यात हवा खेळती राहावी.
अतिउष्ण किंवा अतिथंड वातावरणापासून पैदाशीच्या बोकडाची सुरक्षा करण्याकरिता आवश्यकतेनुसार गोठा व्यवस्थापनात बदल वेळोवेळी करून घ्यावेत. उन्हाळ्यात गोठा थंड राहण्याकरिता गोठ्याचे छत पक्के असेल तर त्यावर गवत टाकावे किंवा चुना मारून घ्यावा. गोठ्याच्या उघड्या बाजू गोणपाटाच्या पडद्याने झाकून घ्याव्यात आणि त्यावर अतिउष्णतेच्या काळात पाणी मारावे. थंडीच्या काळात अतिथंड वातावरणात गोठ्याच्या उघड्या बाजू गोणपाटाच्या पडद्याने झाकून घ्याव्यात, बोकड (Buck) उभे राहण्याच्या जागेवर गवत अंथरून घ्यावे.बोकडाच्या छातीस सुती कपडा बांधावा.
हेही पाहा- कुर्बानीकरता बोकड पालन
बोकडास दिला जाणारा आहार हा सकस, भरपूर उच्चप्रतीचे अन्नघटक आणणारा असावा. आहार देण्यापूर्वी, त्यात बुरशी किंवा इतर कुठलेही विषारी घटक असू नयेत. यामुळे बोकडाच्या आरोग्यावर तसेच वीर्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. बोकडास दिल्या जाणाऱ्या आहारात सकस हिरवा, चारा, उच्च प्रतीचा सुका चारा तसेच पशुखाद्याचा समावेश असावा. दररोज ३५ ते ४० किलो वजन असलेल्या ३ ते ५ किलो सकस हिरवा चारा, १/२ किलो उच्च प्रतीचा सुका चारा आणि २००-३०० ग्रॅम एवढे द्यावे. पैदाशीच्या बोकडाच्या आहारात सरकी, सरकी ढेप असू नये. यामुळे त्यांच्या वीर्य गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
आहारात क्षारमिश्रण (Mineral Mixture) आणि जीवनसत्त्व मिश्रणाचा वापर करावा. प्रोबायोटिक्सचा समावेश करावा. बोकडांना दिल्या जाणारे पशुखाद्य बुरशी, उंदीर, घुशीपासून सुरक्षित राहील असे ठेवा, तसेच अधिक काळ साठवलेले पशुखाद्य देऊ नये. बोकडांना पिण्याकरिता २४ तास स्वच्छ पाणी (Water) उपलब्ध असावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.