

जनावरांचा गोठा animal shed) बांधताना उंचावरील कठीण व सपाट जागेची निवड करावी. यामुळे गोठ्यातील मलमूत्र, सांडपाणी याची योग्य विल्हेवाट लावणे सोयीचे जाईल. गोठ्यात चाऱ्यासाठी योग्य गव्हाण (manger) आणि प्रत्येक जनावरास हालचालींसाठी पुरेशी जागा मिळेल याची विशेष काळजी घ्यावी. गोठ्याचे छत योग्य उंचीवर आणि न गळणारे असावे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील अशी व्यवस्था असावी.
हेही पाहा- अपचनामुळे जनावरांच्या शेणात कोणते घटक दिसून येतात?
जमिनीस गव्हाणीकडून उतार दिलेला असावा. जनावरांना योग्य पद्धतीने चारा खाता येईल, अशा पद्धतीने गव्हाण बांधावी. गव्हाणीचा पृष्ठभाग हा गुळगुळीत आणि काठ गोलाकार असावा. गोठा हवेशीर राहील या पद्धतीने भिंतीचे बांधकाम करावे. गोठ्यातील छत कठीण, टिकाऊ असावे. जनावरांना ताजे, स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी कायम उपलब्ध राहण्यासाठी हौद किंवा टाकी बांधून घ्यावी. हेही वाचा- शेळीपालनाची संपूर्ण माहिती अगदी मोफत- भाग ५ गोठा बांधण्याच्या पद्धती : यात दोन पद्धती येतात शेपटीकडे शेपटी पद्धत (Tail to tail system) - या पद्धतीमध्ये जनावरांना धुण्यासाठी व दूध काढण्यासाठी दोन्ही ओळींमधील जागा अधिक उपयोगी पडते. जनावरांचे तोंड बाहेरच्या बाजूस असल्याने संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते, तसेच बाहेरच्या बाजूने ताजी हवा मिळते. जनावरांवर देखरेख करणे सोपे जाते. माजावरील जनावरे सहज ओळखता येतात. हेही वाचा- शेळ्या आजारी पडण्याची विविध कारणे? तोंडाकडे तोंड पद्धत (Head to head system) – या पद्धतीत तोंडाकडे तोंड करून बांधलेल्या जनावरांचे योग्य पद्धतीने निरीक्षण करता येते. गोठ्याच्या बाहेरील बाजूस शेणावर सूर्यप्रकाश पडल्याने रोगाच्या प्रसारास काही प्रमाणात अटकाव घालता येतो. जनावरांना चारा टाकणे सोपे जाते. सध्या मुक्त संचार गोठ्याची (Loose Housing) संकल्पना ही विस्तारत आहे. आणि मुक्त संचार गोठ्यात जनावरांच्या दूध उत्पादनातही वाढ दिसून आली आहे. जनावरांचा गोठा हवेशीर, खाच-खळगे नसलेला, सूर्यप्रकाश आत येणारा असावा. गोठा उन्हाळ्यात कमी तापणारा तसेच सभोवताली झाडांची सावली असलेला असावा. उपलब्ध साहित्य वापरून कमी पैशात चांगला गोठा बांधणारा पशुपालक हुशार असतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.