Animal Care : वाढत्या उष्म्याचा म्हशींच्या आरोग्यावर परिणाम

उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हशीमध्ये लक्षणीय पद्धतीने जाणवतो. त्यामुळे म्हशीच्या आहारावर,आरोग्यावर तसचं प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम जाणवतो.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

महाराष्ट्रात उन्हाळ्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जातं.काही जिल्ह्यांत हे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचतं. बहुतांश पशुपालकांकडे म्हशींसाठी गोठ्याची व्यवस्था नसते. त्यामुळे म्हशींना झाडाखाली किंवा कमी सावलीत तर कधी कधी उघड्या जागेत ठेवलं जातं.

उन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हशीमध्ये लक्षणीय पद्धतीने जाणवतो. त्यामुळे म्हशीच्या आहारावर (Buffalo Diet),आरोग्यावर तसचं प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम जाणवतो. 

साधारणपणे म्हशीच्या रेडीची पहिली गर्भधारणा होईपर्यंत ३ उन्हाळ्याचा कालावधी जात असल्याने वातावरणातील काही घटक यामध्ये तापमान,हवेचा वेग आणि दिशा,आर्द्रतेचा म्हशीच्या आरोग्यावर अपायकारक परिणाम होतो.

म्हशीचा रंग काळा आणि घाम ग्रंथी कमी असल्यामुळे शरीरातील उष्णता उत्सर्जित करताना अडचणी येतात.म्हशी शारीरिक तापमान स्वनियंत्रीत करू शकत नाहीत आणि त्यामुळेच, म्हशींना उष्णतेचा ताण किंवा त्रास होत असतो.

उष्णतेच्या ताणामुळे रेडीचे ऋतुचक्र विस्कळते आणि त्या उन्हाळ्यात माजावर येत नाहीत.त्यामुळेच,उन्हाळ्यातील काळ व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. 

Animal Care
Animal Care : जनावरांमधील उष्माघातावर उपचार

उन्हाळ्यात कमी प्रमाणात हिरवा चारा,खाद्य आणि योग्य निवारा व्यवस्था नसल्यामुळे रेडीची शारीरिक वाढ खुंटते.प्रजोत्पादनक्रिया काहीशा प्रमाणात विस्कळल्याने भविष्यात मिळणाऱ्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. 

सुरवातीपासूनच रेडीचे योग्य व्यवस्थापन असल्यास प्रजोत्पादनक्रिया लवकर कार्यान्वित होते.साधारणपणे पहिले वेत वयाच्या चौथ्या वर्षी होऊ शकते.काही कारणांनी रेडीचे पहिले वेत उशिरा होत असल्यास दैनंदिन व्यवस्थापन खर्चात नाहक वाढ होते.

वातावरणातील अति जास्त तापमान आणि आर्द्रता या घटकांचा रेडीच्या शारीरिक वाढीवर विपरीत परिणाम होत असल्याने शरीरातील संप्रेरकीय संतुलन बिघडून पहिल्यांदा उशिरा माजावर येतात,काही वेळेस गाभण रेडीचा गर्भपात होतो किंवा व्याल्यानंतरच्या समस्या उद्भवतात.

Animal Care
Animal Care : जनावरांतील आयोडीन कमतरता कशी भरुन काढाल?

उपाय काय आहेत?

उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात हिरवा चारा,प्रथिनयुक्त पोषक खाद्य व योग्य निवारा उपलब्ध असल्यास उष्णतेच्या ताणापासून  संरक्षण करून वाढ चांगली होते. 

म्हशींसाठी पुरेसं पाणी, खाद्याची व्यवस्था ठेवावी यामुळे शरीरक्रिया सुरळीत चालते.म्हशी स्वतःचे शारीरिक तापमान बाहेरील तापमानाशी स्वनियंत्रित करतात. 

म्हशींना सकाळी लवकर बाहेर चरायला सोडावं किंवा दुपारी ४ वाजेनंतर पुन्हा चरायला सोडावं.दुपारी शरीरावर ३ ते ४ वेळा थंड पाण्याचे तुषार पडतील अशी व्यवस्था करावी. 

मुक्त संचार गोठ्यातील टाकीत कायम पाणी भरून ठेवावं. 

म्हशी थंड वातावरण असताना वैरण योग्य रीतीने खातात.या कालावधीत पुरेशी वैरण द्यावी.

प्रजननक्षम रेडीची योग्य देखभाल करावी.माजावर येत आहे का ? किंवा मुक्या माजाची लक्षणे दाखवितात याकडे लक्ष ठेवावं. 

गाभण जनावरांना अतिरिक्त मात्रेत खनिज मिश्रणे आणि जीवनसत्वे नियमीत खाद्यात पुरवावीत. 

जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्यांना थंड आणि शांत ठिकाणी बांधावं, थंड पाणी पाजावं. शरीरावर थंड पाणी शिंपडावं. पशुवैद्यकीय उपचार करावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com