ड्रीपद्वारे खते देण्याच्या पद्धती

पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन या सिंचन पद्धतीचा वापर करावा.
Fertigation
FertigationAgrowon

पाण्याची उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर केला पाहिजे. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये ठिबक सिंचन (drip irrgataion), तुषार सिंचन (sprinkler irrigation) या सिंचन पद्धतीचा वापर करावा. जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सिंचन पद्धतीतून पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर करावा. पिकांच्या उत्तम वाढीसाठी लागणारे पोषक घटक द्रव स्वरुपात देण्याच्या पद्धतीला फर्टिगेशन (fertigation) म्हटले जाते.

पाण्यामार्फत दिल्या जाणाऱ्या विद्राव्य खतांचे एकूण तीन प्रकार येतात. यात द्रवरूप विद्राव्य खते, घनरूप विद्राव्य खते आणि पारंपारिक विद्राव्य खते यांचा समावेश होतो.

पारंपारिक पद्धतीने रासायनिक खते देत असताना, त्यांची कार्यक्षमता ५० टक्क्यांच्या जवळपास असते. या खतांमधील घटक त्वरित पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे ही खते, पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळणारीही नसतात. याउलट विद्राव्य खतांमधील अन्नद्रव्ये पाण्यात विरघळून, पिकांसाठी त्वरित उपलब्ध होतात.

Fertigation
डांगीसाठी राखीव रान संकल्पना काय आहे? । Reserved Forest Area | Dangi Cow Part-4 | ॲग्रोवन

ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खते देताना, ड्रिपर्समध्ये मातीचे कण किंवा इतर कचरा जाणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. कोणतीही खते पाण्याबरोबर देताना, ती पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळणारी असावी. पाण्यातून खतांची मात्रा देत असताना, काही वेळेस पाण्यातील मीठ किंवा इतर रसायनाबरोबर खताची रासायनिक प्रक्रिया होऊन, कॅल्शियम व सल्फेटपासून जिप्सम तयार होतो. असे झाल्यास ड्रिपर्स ब्लॉक होतात. अशा वेळी आम्लाची रसायनिक प्रक्रिया करून संच साफ करून घ्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com