चोपण जमीन सुधारणेसाठी करा हे उपाय !

या जमिनीत विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. सामू ८.५ ते १० पर्यंत असतो. अशा जमिनीला चोपण जमीन म्हटले जाते.
Chopan land information
Chopan land informationAgrowon

आपल्याकडे वातावरणाप्रमाणे मातीतही विविधता आढळून येते. अनेक प्रकारची माती आपल्याकडे आढळून येते. यात चोपण जमीन, क्षारपड जमीन यांसारखे प्रकार दिसून येतात. जमिनीचे हे प्रकार तिच्या सामूवर पडत असतात. म्हणून कोणत्याही जमिनीचे व्यवस्थापन करणे म्हणजे त्या जमिनीचा सामू नियंत्रित ठेवणे होय.

चोपण जमिनी ओलसर असताना इतक्या चिकट असतात की, काही वेळेस पेरलेलेही उगवत नाही. सामू नियंत्रित ठेवण्यासाठी काही शेतकरी जमिनीत अॅसिड टाकतात. परंतु अॅसिड टाकल्याने जमिनीतील सुक्ष्मजीवाणु मृत्यु पावतात. काही शेतकरी बाहेरून तांबडी माती विकत आणून ती चोपण जमिनीत टाकतात, त्यामुळे खर्चात अतिरिक्त वाढ होते.

Chopan land information
गाभण गाय का आटवितात ?

या जमिनीत विनिमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते. सामू ८.५ ते १० पर्यंत असतो. अशा जमिनीला चोपण जमीन म्हटले जाते. जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. पाण्याची मात्रा दिल्यानंतर ही जमीन चिकट होते. तर वाळल्यावर हीच जमीन टणक होते. जमिनीत हवा खेळती राहत नाही त्यामुळे या जमिनीत पिकांची वाढ योग्य होत नाही.

Chopan land information
आकाराने लहान पण दुधातील फॅट जास्त असलेली जर्सी गाय

चोपण जमिनीची आरोग्य सुधारणा आणि अन्नद्रव्ये व्यवस्थापन-

चोपण जमिनीला १ टक्के उतार द्यावा. योग्य अंतरावर चर काढावेत. जमिनीखाली सच्छिद्र पाईप टाकून पाण्याचा भूमिगत निचरा करावा. जमिनीत सच्छिद्र पाईप टाकल्यानंतर त्यातून पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी जमिनीचा उतार योग्य ठेवावा. माती परीक्षण करून जिप्सम ८ ते १० टन प्रति हेक्टरी शेणखतामध्ये मिक्स करून जमिनीत टाकावे.

चोपण जमिनीत कोणतेही पिक घेत असताना सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. पिकांची फेरपालट करत असताना धैंचा जमिनीत गाडावा. माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे. नत्राची मात्रा देत असताना २५ टक्के जास्त द्यावी. या जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने, ऊस, कापूस यांसारखी पिके घेऊ शकतो.

युरियाचा वापर करणे टाळावे. त्याऐवजी अमोनियम सल्फेट तसेच सिंगल सुपर फोस्फेट या आम्लयुक्त खताचा वापर करावा. कमतरतेनुसार सुक्ष्मअन्नद्रव्यांचा विशेषतः जस्त आणि लोहाची मात्रा शेणखतामधून द्यावी. पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचनाद्वारे करावे. पाण्यात विद्राव्य रासायनिक खते देखील ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यावीत. यामुळे ४० ते ५० टक्के पाण्याची आणि खतांची बचत होते.

रासायनिक खते देताना निंबोळीसोबत द्यावीत. चुका नावाची वनस्पती आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळून येते. चुक्याच्या पानांचा सामू हा ४ पर्यंत असतो. पावसाळा सुरु होण्यापूर्वी चोपण जमिनीत चुक्याच्या बिया आणून टाकाव्यात. चुक्याच्या वनस्पतीला पाने आल्यानंतर ती नांगरणी करून जमिनीत गाडावीत. असे प्रयोग लागोपाठ तीन वर्षे केल्यास जमिनीत सुधारणा दिसून येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com