म्हशींसाठी चाऱ्याची पाैिष्टक वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया

युरिया प्रक्रियायुक्त चारा रुचकर व चवदार असतो. त्यामुळे म्हशी अावडीने खातात.
युरिया प्रक्रियायुक्त चारा रुचकर व चवदार असतो. त्यामुळे म्हशी अावडीने खातात.
Published on
Updated on

निकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या पोषणमूल्यांच्या पूर्ण उपयोग करण्याकरिता चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया केल्यास निकृष्ट चाऱ्याची पौष्टिकता वाढते. चाऱ्याची चव, पाचकता व त्यातील नत्राचे प्रमाण वाढते. त्यामुळे म्हशी चारा अावडीने खातात. म्हैसपालनामध्ये सर्वाधिक खर्च हा म्हशीच्या चारा व पशुखाद्यावर होतो. ग्रामीण भागात जनावरांसाठी शेतातील उत्पादित पिकाचा चारा म्हणून उपयोग केला जातो. उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने पाण्याच्या कमतरतेमुळे चारा घेणे अशक्‍य होते, या वेळेस म्हशींना फक्त उत्पादित पिकांचा वाळलेला चारा म्हणून उपयोग होतो. म्हैसपालकांचा म्हशीसाठी वेगळा चारा उत्पादित करण्याकडे कमी कल असतो. बाजारपेठेत तयार चाऱ्याची सरासरी १० ते १२ रु प्रतिकिलो दराने विक्री होते. परंतु, अशा चाऱ्याची गुणवत्ता चांगली असेलच याची खात्री नसते. यामुळे म्हशीच्या दूध उत्पादन व आरोग्यावर परिणाम होतो. 

निकृष्ट चाऱ्यामुळे म्हशीवर होणारे परिणाम

  • म्हशीसाठी चारा म्हणून गव्हांडा किंवा गव्हाचे तणस, भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार, बाजरीचे सरमाड इ. घटकांचा प्रामुख्याने वापर होतो. परंतु, अशा चाऱ्यांची सकसता कमी असते, यातून पचनीय घटक कमी मिळतात.  
  • म्हशीच्या वाढीवर, दूधउत्पादन, आरोग्य अाणि प्रजननावर विपरीत परिणाम जाणवतो. अशा चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते व पाचकताही अत्यल्प असते. यामुळे पोषणतत्त्वे कमी किंवा अत्यल्प प्रमाणात मिळतात. 
  • निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यामध्ये लिग्नो सेलुलोज कॉप्लेक्‍स असल्यामुळे रवंथ करणाऱ्या पोटामध्ये जिवाणूंची प्रक्रिया चाऱ्यावर न झाल्यामुळे याचे विघटन होत नाही व प्रथिने म्हशीच्या शरीरासाठी उपलब्ध होत नाहीत.
  • प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी

  • चाऱ्यावर युरिया प्रक्रिया सावलीमध्ये करावी.
  • १०० किलो निकृष्ट चाऱ्याकरिता ४ किलोच युरिया वापरावा, याचे प्रमाण वाढवू नये.
  • काडीच्या साहाय्याने द्रावण हलवून प्रत्येक थरावर एकजीव मिसळावे.
  • प्रक्रियायुक्त चाऱ्याचे फायदे

  • चारा रुचकर व चवदार असतो. त्यामुळे म्हशी अावडीने खातात.
  • चाऱ्याची पाचकता २० ते ३० टक्के वाढते, तर प्रथिनांचे प्रमाण ३ ते ४ टक्के इतके वाढते. यामुळे सकस किंवा पौष्टिक चारा म्हशींना मिळतो.
  • कमी किमतीचा, शेतातील निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा तयार होतो. यामुळे चाऱ्यावरील खर्च कमी होतो व आर्थिक फायदा होतो.
  •   युरिया प्रक्रिया करण्याची पद्धत

  • साधारणपणे १०० किलो किंवा त्या पटीने निकृष्ट चाऱ्याची कुट्टी वजन करून घ्यावी.
  • वजन केलेल्या चाऱ्याची कुट्टी जमिनीवर पोत्यावर किंवा प्लॅस्टिकच्या जाड पेपरवर सावलीमध्ये पसरवावी. यामुळे मुरलेल्या खालच्या चाऱ्याला माती लागत नाही.
  • युरियाचे प्रमाण चाऱ्याच्या वजनाच्या ४ टक्के इतके असावे. म्हणजे १०० किलो निकृष्ट चाऱ्याकरिता ४ किलो युरिया वापरावा.
  • प्रति १०० किलो चाऱ्याच्या प्रक्रियेसाठी ६० लिटर पाणी घेऊन त्यात ४ किलो युरिया एकजीव मिसळून द्रावण करावे.
  • तयार झालेल्या द्रावणात १ किलो मीठ मिसळून एकजीव करावे.
  • चाऱ्याचा ६ इंच थर करावा व पसरलेल्या चाऱ्यावर झारीच्या साहाय्याने द्रावण एकसारखे शिंपडावे व चारा हलवून एकजीव करावे.
  • अशा प्रकारे चाऱ्याचे प्रत्येकी ६ इंचांचे एकावर एक थर द्यावेत, त्यामध्ये युरिया द्रावण एकजीव मिसळावे.
  • प्रत्येक थरात द्रावण मिसळल्यानंतर दाबून चाऱ्यातील जास्तीत जास्त हवा बाहेर काढावी.
  • संपूर्ण चाऱ्यावर द्रावण मिसळल्यानंतर प्लॅस्टिक कागदाने चाऱ्याचा थर झाकून हवाबंद करावा.
  • हवाबंद चाऱ्यामध्ये बाहेरील हवा व पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • हवाबंद केल्यानंतर २१ दिवसांनी चाऱ्यावर युरियाची प्रक्रिया होते म्हणून कमीत कमी २१ दिवसांपर्यंत हा चारा हवाबंद ठेवावा.
  • म्हशींना चारा खाण्यास देण्यापूर्वी दोन तास अगोदर चारा मोकळ्या हवेत ठेवावा. उरलेला चारा त्वरित प्लॅस्टिकने झाकावा.
  • सुरवातीस कमी प्रमाणात देऊन १० दिवसांनी ३-५ किलोपर्यंत प्रक्रियायुक्त चारा म्हशींना खाण्यास द्यावा.
  • तीन ते चार महिन्यांपेक्षा लहान असलेल्या रेडकांना चारा देऊ नये यामुळे युरियाची विषबाधा होऊ शकते.
  • संपर्क ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ (स्नातकोतर पशुवैद्यक व  पशुविज्ञान संस्था, अकोला.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com