शेळ्यांना द्या सकस आहार...

शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पौष्टिक, संतुलित तसेच सकस आहार व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात कर्बोदके, प्रथिनांचे योग्य प्रमाण असावे. हिरवा चारा, सुका चारा व खुराक यांची आहारात योग्य मात्रा असावी.
provide nutritious fodder to goats
provide nutritious fodder to goats

शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पौष्टिक, संतुलित तसेच सकस आहार व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात कर्बोदके, प्रथिनांचे योग्य प्रमाण असावे. हिरवा चारा, सुका चारा व खुराक यांची आहारात योग्य मात्रा असावी.

शेळीच्या वजनास विशेष महत्त्व असते. त्यामुळे कमी कालावधीत जास्त वाढीसाठी त्यांना संतुलित आहार द्यावा. त्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पौष्टिक, संतुलित तसेच सकस आहार व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात कर्बोदके, प्रथिनांचे योग्य प्रमाण असावे. हिरवा चारा, सुका चारा व खुराक यांची आहारात योग्य मात्रा असावी. कर्बोदकांसाठी कडबा (ज्वारी, बाजरी इ.) तर प्रथिनांच्या पूर्ततेसाठी कडधान्ये भुसा व पेंड्यांना प्राधान्य दिले जाते. उदा. चवळी, मूग, हरभरा, तूर या पिकांच्या भुसकट व टरफलांना प्रथिनांचा स्त्रोत म्हणून ओळखले जाते. हिरव्या चाऱ्यापासून कर्ब व प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. ल्युसर्न, बरसीम, लसूण गवत, मका, चवळी या पिकांचा समावेश आहारात करणे फायद्याचे ठरते. अतिरिक्त खुराक म्हणून पेंड किंवा पशूखाद्य पुरविणे आवश्‍यक आहे. आहारात भुईमूग पेंड, सरकी पेंड, अझोला, पशूखाद्याचा वापर करणे फायदेशीर ठरते. चारा पिके 

एकदल वर्गीय गवत  द्विदल वर्गीय गवत  कोरडा चारा पारंपरिक झाडे
मारवेल   ल्यूसर्न  ज्वारी कडबा बोर
मका-३ बरसीम  तुरभुसा     वड
सीओ-४     चवळी हरभरा भुसा आपटा
फुले जयवंत  शेवरी सोयाबीन भुसा पिंपळ
 पॅरा गवत दशरथ  भुईमूग वेल   जांभूळ

         लसीकरणाचे वेळापत्रक

लसीचे नाव  रोगप्रतिकार शक्तीचा काळ
पी. पी.आर ३ वर्षे (दरवर्षी दिल्यास उत्तम)
आंत्रविषार  दर ६ महिन्याने (३ आठवड्यांनी बुस्टर)
लाळ्या खुरकूत+ घटसर्प १ वर्ष (एकत्र किंवा वेगवेगळी)
धर्नुवात  दर ६ महिन्याने
देवी १ वर्ष
  • पिल्लाचे वय ३ ते ४ महिने झाल्यावर ३ आठवड्याच्या अंतराने खालीलप्रमाणे लस द्याव्या. पीपीआर—› आंत्रविषार—›  आंत्रविषार बुस्टर—›  लाळ्या खुरकत—›  घटसर्प—›  धनुर्वात —› देवी
  • लसीकरणाबरोबरच जंतुनाशक आणि बाह्य परजिवींच्या निर्मूलनाकडे लक्ष देणे ही  महत्त्वाचे असते.
  • संपर्क- योगेश पाटील, ७५८८७६१४४८ (पशुसंवर्धन व दुग्धशास्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली,जि.रत्नागिरी)

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com