कोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचार

उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत द्यावे.छत थंड ठेवण्याकरिता गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे दिवसातून ३ ते ४ वेळेस द्यावेत.
poultry bird
poultry bird
Published on
Updated on

उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत द्यावे. छत थंड ठेवण्याकरिता  गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे  दिवसातून ३ ते ४ वेळेस द्यावेत.

कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त ताण उन्हाळ्यात येतो. साधारणतः ३५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत कोंबड्यांना विशेष ताण येत नाही. परंतु, उन्हाळ्यात तापमान यापेक्षा खूप अधिक वाढते. अशा वेळी शेडमध्ये भरपूर खेळती हवा असणे आवश्‍यक असते. छत थंड ठेवण्याकरिता छतावर गवताचे आच्छादन करावे. शक्‍य असल्यास छतावर व पडद्यावर पाण्याचे फवारे (फॉगर्स) दिवसातून ३ ते ४ वेळेस द्यावेत. खाद्य देण्याच्या वेळा 

  •  उन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी थंड वेळेत द्यावे. 
  •  सकाळच्या वेळी कोंबड्यांच्या शरीरात ऊर्जानिर्मिती २० ते ७० टक्के कमी असते. खाद्याद्वारे निर्माण होणारी ऊर्जा ही थंड वेळेत केवळ दोन तासांपर्यंत परिणाम दर्शविते, तर वातावरणातील तापमान हे ३५ अंश सेल्सिअस किंवा अधिक असताना हा परिणाम १० तासांपर्यंत असतो म्हणजेच केवळ खाद्य थंड वेळेत दिले तरी आपण ताण बराच कमी करू शकतो.
  • शेड    शेड पूर्व-पश्‍चिम असावी. यामुळे हवा खेळती राहते. कोंबड्यांना प्रत्यक्ष उन्हापासून संरक्षण मिळते. पोल्ट्री शेडमध्ये गर्दी टाळावी. आवश्‍यक तेवढ्या कोंबड्या ठेवाव्यात. छतावर पाण्याचे फवारे लावावेत. छत झाकून ठेवावे. पोल्ट्री शेडच्या छतावर व भिंती पांढऱ्या (चुना) रंगाने रंगवाव्यात. औषधोपचार 

  • कोंबड्यांच्या दैनंदिन खाद्यात जीवनसत्त्व सी आणि ई यांचा वापर करावा.
  • जीवनसत्त्व ई चा वापर २५० मि. ग्रॅ. प्रति किलो खाद्य व जीवनसत्त्व सी चा वापर ४०० मि. ग्रॅम प्रति किलो खाद्य करावा. सोबतच इलेक्‍ट्रोलाइट्‌स व डेकस्ट्रोजचा वापर  आवश्‍यक आहे. कर्बोदकांऐवजी फॅटचा उपयोग खाद्यातून करावा.
  • औषधी वनस्पतींचा वापर

  •   ताण कमी करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर अत्यंत उपयुक्त ठरतो.
  •   जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्याकरिता आवळा व संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय वनस्पतींचा वापर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात करावा.
  •   आवळा : १०-२० ग्रॅम प्रति १०० कोंबड्या.    संत्री/ लिंबू : ३०-४० ग्रॅम प्रति १०० कोंबड्या.    लिंबू किंवा संत्र्याची सालदेखील उपयुक्त आहे. 

  • औषधोपचारामध्ये अश्‍वगंधा ४ ग्रॅम, तुळस ४ ग्रॅम,मंजिष्ठा,४ ग्रॅम, शतावरी ५ ग्रॅम यांचा वापर करावा. या सर्व वनस्पती एकत्र करून खाद्यातून १०० कोंबड्यांसाठी वापराव्यात. 
  • पाण्यातून वापर करताना वरील वनस्पतींमध्ये चार पट पाणी मिसळून उकळाव्यात.अर्धे पाणी राहिल्यानंतर द्रावण गाळून हा अर्क १० ते १५ मि.लि. प्रति १०० कोंबड्यांना द्यावा.
  • - डॉ. गणेश काळुसे,  ९०११०२१२८० (विषय विशेषज्ञ(पशू संवर्धन व दुग्धव्यवसाय)  कृषी विज्ञान केंद्र , बुलडाणा)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com