हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत चाऱ्याची निर्मिती करता येते.एक किलो बियाण्यापासून ७ ते ८ किलो चारा तयार होतो. मोड आल्यामुळे चाऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.हायड्रोपोनिक्स चारा निर्मितीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते.
येत्या काळात जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धत हिरव्या चाऱ्याची निर्मिती करावी. कमी खर्चामध्ये शेडनेटमध्ये हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन करता येते. बांबू, लाकूड, लोखंडी पाईप यांचा वापर करून सांगाडा उभारता येतो. या सांगाड्याला शेडनेटचे कापड लावून तात्पुरते हरितगृह तयार करता येते. यामध्ये स्वयंचलित सूक्ष्म सिंचनाद्वारे किंवा पाठीवरील पंपाद्वारे ठरावीक कालावधीमध्ये पाणी फवारणी केली जाते. या तंत्राद्वारे चारानिर्मिती करताना धान्याची उगवण व उत्पादन हे वातावरणातील घटकांवर अवलंबून असते. हंगाम, उष्णता, हवेतील आर्द्रता इत्यादी घटकांचा उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. आपल्याकडे चारा निर्मितीसाठी मका पिकाचा वापर अधिक योग्य आहे. मका बियाणाची उपलब्धता, कमी किंमत, जलद वाढ, अधिक उपलब्धता यामुळे या पिकाची निवड योग्य ठरते. चारा निर्मितीसाठीचे बियाणे चांगल्या प्रतीचे स्वच्छ, कीडमुक्त, प्रक्रिया न केलेले, उगवण क्षमता व चांगल्या प्रतीचे असावे. बियाणांची चांगली उगवण ही चारा निर्मिती प्रक्रियेतील महत्त्वाची बाब आहे. उगवण प्रक्रिया वेगाने होण्यासाठी मका बियाणे ४ ते ५ तास पाण्यात चांगले भिजवावे. या प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणारे ट्रे देखील निर्जंतुक करणे आवश्यक आहे. निर्जंतुकीकरण केल्याने बुरशीची वाढ होत नाही. बियाणे पाण्यात भिजवल्यानंतर १ ते २ दिवस गोणपाटात दडपून ठेवल्यास बियाणांना कोंब फुटतात. कोंब आलेले बियाणे ट्रे मध्ये स्थलांतरित करावे. चारा उत्पादन
चारा निर्मितीमधील ठळक मुद्दे हंगामानुसार मका, बाजरीचे बियाणे १२ ते १४ तास पाण्यात भिजत ठेवावे. बियाण्याला कोंब येण्यासाठी २४ तास किंवा जास्त काळ गरजेनुसार पोत्यात अथवा सुती कापडात गुंडाळून ठेवावे. दोन फूट लांब आणि रुंद ट्रेमध्ये ८०० ग्रॅम ते एक किलो बियाणे पसरून ठेवावे. एका खोलीत अथवा चारी बाजूने आडोसा असलेल्या जागेची निवड करावी. बांबूच्या साहाय्याने एकावर एक रचलेला सांगाडा करून त्यामध्ये ट्रे ठेवावेत.दर एक तासाने एक मिनिट किंवा दर दोन तासाने दोन मिनिटे बियाणांवर पाण्याचा शिडकावा करावा.दहाव्या दिवसापर्यंत दहा इंच उंचीचा हायड्रोपोनिक्स चारा तयार होतो.
चाऱ्याचे फायदे
- डॉ. समीर ढगे, ९४२३८६३५९६ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, कराड)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.