पशुसल्ला

पशुसल्ला
पशुसल्ला
Published on
Updated on

सध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त प्रमाणात थंडी सुरू झाली आहे.  थंडीमुळे जनावरांच्या उत्पादनावर परिणाम होतो. काही ठिकाणी जनावरांचे गोठे बाजूने मोकळेच ठेवले जातात. जास्त थंडी वाढल्यास त्याचा जनावरांना त्रास होतो. जनावरांची त्वचा कोरडी होते. दुधाळ जनावरे पान्हा लवकर सोडत नाहीत. थंड तापमानात जनावरांचे पुढीलप्रमाणे व्यवस्थापन ठेवावे.

१) आहार व्यवस्थापन

  • थंडी वाढल्यामुळे जनावरांना ऊर्जा जास्त प्रमाणात लागते म्हणून जनावरे चारा जास्त खातात.
  •  जनावरे हिरवा चारा कमी खातात. कारण हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.
  • थंडीमुळे जनावरांच्या शरीरावर ताण येतो व शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी शरीराला ऊर्जा जास्त लागते. म्हणून जनावरांना योग्य पौष्टिक आहार व ऊर्जायुक्त आहार देणे गरजेचे असते.
  • २) गोठा व्यवस्थापन

  •  थंड हवेमुळे जनावरांची त्वचा थंड होऊन शरीराचे तापमानही कमी होते. त्याचबरोबर जनावरे आखडून उभे राहते.
  •  रात्रीचे थंड वारे/ हवा लागून दुधाळ जनावरांच्या सडाला, कासेला चिरा पडतात व रक्त येते, त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. जखम लवकर बरी होत नाही. हे होऊ नये म्हणून गोठ्याच्या बाजूने पडदे लावावेत, जेणेकरून रात्री जनावरांना जास्त थंड हवा लागणार नाही. पडदे रात्री ८ वाजता बंद करून पहाटे ७ नंतर उघडावे व दिवसभर गोठ्यात हवा खेळती राहू द्यावी.
  •  गोठ्यातील जागा ओलसर असल्यास जनावरे लवकर खाली बसत नाहीत किंवा जास्त वेळ उभेच राहतात, यामुळे जनावरांवर ताण येतो. जर गोठ्यातील जागा ओली असेल, तर त्यावर कोरडा पालापाचोळा किंवा भुसा टाकावा व गोठा कोरडा ठेवावा.
  • जनावरांची धार काढताना
  •  बऱ्याच वेळा दूध काढतेवेळी कास धुण्यासाठी थंड पाणी वापरले जाते, यामुळे जनावरे पान्हा लवकर सोडत नाही.
  •  पहाटेच एकदम थंड पाणी कासेला लागल्यामुळे जनावर दचकते, उडी मारते व पान्हा पूर्णपणे सोडत नाही. यामुळे एकतर दूध उत्पादन याचबरोबर पूर्ण दूध न निघाल्यामुळे दुधातील स्निग्धांचे प्रमाण कमी होते.
  •  थंड पाण्यामुळे कासही कडक होते. त्यामुळे कास धुण्यासाठी कोमट पाणी वापरावे, जेणेकरून जनावरांना त्रास होणार नाही व जनावरे पान्हा पूर्णपणे व लवकर सोडतील.
  •  पान्हा न सोडल्यामुळे दूध हे जास्त काळ कासेमध्ये राहिल्यास कासदाह होतो, यामुळे एकतर दूध उत्पादन कमी होते किंवा कासदाह होऊन कास पूर्णपणे निकामी होण्याची शक्‍यता असते. फायदे
  •   जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
  •    जनावरे वेळेवर मजावर येऊन गर्भधारणा वेळेवर होते.
  • दूध उत्पादन वाढते.
  •   डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५  डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com