
अगदी जिरायती क्षेत्रातही २ ते १० गुंठ्यांपर्यंत शेततळी झाली असून, त्यात मत्स्यपालन केल्यास उत्तम फायदा होऊ शकतो. यशस्वी मत्स्यपालनासाठी काटेकोर नियोजन करावे. त्यासाठी खालील सूत्रे लक्षात ठेवावीत. देशातील ६२ टक्के शेतकऱ्यांकडे १ हेक्टरपेक्षाही कमी, तर १९ टक्के शेतकऱ्यांकडे १ ते २ हेक्टर एवढी शेतजमीन आहे. केवळ शेतीवर कुटुंबाची उपजीविका होण्यामध्ये अडचणी येतात. शेतीसोबत पशुपालन, कोंबडीपालन, शेळीपालन, मत्स्यपालन यांपैकी शक्य तो पूरक व्यवसाय करणे आवश्यक ठरते. महाराष्ट्रामध्ये जिरायती शेतीचे प्रमाण मोठे असून, पाण्याच्या शाश्वततेसाठी शेततळ्यांच्या निर्मितीला राज्य शासनाच्या वतीने प्रोत्साहन दिले जाते. उदा. २०१५-१६ वर्षापासून "मागेल त्याला शेततळे'' ही योजना अमलात आणली. शेततळ्याचे आकारमान साधारणतः २.२ ते ९ गुंठे एवढे असते. या तळ्यात १० ते २० फूट खोल पाणी असते. पिकांच्या संरक्षित पाण्याची सोय त्यातून होते. या पाण्यामध्ये मत्स्यपालन करणेही शक्य आहे. याचे दोन फायदे होतात.
मात्र, अनेक शेतकरी केवळ मासे तळ्यामध्ये सोडून दुर्लक्ष करतात. त्याने फारसा फायदा पदरात पडत नाही. त्याऐवजी काटेकोर नियोजन करून शास्त्रशुद्ध पद्धतीने मत्स्यपालन केल्यास फायदा वाढू शकतो.
मत्स्यपालन करताना घ्यावयाची काळजी... १. सिल्पोलिन लायनिंग व तळे तयार करणे ः
२. मत्स्यपालन पूर्व तयारी ः
३. मस्त्यपालनाकरिता माशांची निवड ः-
४. मासळी बीज कसे असावे?
५. शेततळ्यात माशांचे व्यवस्थापन अ) खाद्य व्यवस्थापन ः मत्स्य पालनामध्ये थोड्या जागेत व ठराविक वेळात मासे वाढवायचे असतात. त्यासाठी माशांना नियमितपणे ठरलेल्या वेळी व ठराविक प्रमाणात खाद्य द्यावे. भुईमूग पेंड/सोयाबीन पेंड/सूर्यफूल पेंड यापैकी एक पेंड व भाताची किंवा गव्हाची भुशी हे खाद्य १ः१ प्रमाणात मिसळून, रात्रभर भिजत घालून दुसऱ्या दिवशी छोट्या गोळ्या करून द्यावे. त्याचे प्रमाण तक्ता २ प्रमाणे ठेवावे. तलावाच्या नैसर्गिक उत्पादनाप्रमाणे कमी जास्त करावे.
ब) पाणी व्यवस्थापन ः पिकासाठी ज्या प्रमाणे मातीचा पोत सांभाळणे आवश्यक असते, त्याप्रमाणे माशांसाठी पाण्याचा उच्च दर्जा राखावा. पाण्याचा हिरवट रंग शेवाळामुळे न येता सूक्ष्म एकपेशीय वनस्पती (प्लवंग)मुळे आलेला असावा. पाण्याचा सामू कमी झाल्यास योग्य प्रमाणात चुनखडीचे पाण्यात द्रावण करून मग टाकावी.
६. माशांचे उत्पादन व अधिक दरासाठी ः
७. शेततळ्यापासून मासे पकडणे ः तळ्यात ४-५ फूट पाणी असताना फेक जाळे किंवा वढप (ओढायचे जाळे) जाळ्याने मासे पकडता येतात. त्यापेक्षा खोल (१० ते २० फूट) पाण्यामध्ये फसले जाळ्याचा वापर करावा.
मत्स्यपालनात हे टाळा...
डॉ. विजय जोशी, ९४२३२९१४३४ ( लेखक मत्स्यमहाविद्यालय, रत्नागिरी येथील निवृत्त सहयोगी अधिष्ठाता आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.