जनावरांतील औषधोपचारापेक्षा लसीकरणाचा खर्च कमी आहे. यासाठी जनावरांतील रोगप्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. वेळेवर लसीकरण करावे. जनावरांची आरोग्य तपासणी करावी. जनावरांचे व्यवस्थापन अयोग्य झाल्यास त्यांच्या शरीरात ताण वाढून त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीत घट होते. जनावरांच्या शरीरावर ताण वाढू नये म्हणून त्यांना संतुलित आहार द्यावा. निवारा सर्व ऋतूत आरामदायक असावा. गोचीड, माश्या इत्यादी पासून मुक्तता असावी. जनावरांचे शरीर, गोठा आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती इत्यादीच्या बाबतीत सर्वांगीण स्वच्छता आवश्यक आहे.जनावरांच्या पोटात वेगवेगळे जंत होतात. जनावरांच्या शरीरावर गोचीड, गोमाशा , पिसवा यासारखे कीटक वाढतात, हे परोपजीवी असून ते जनावरांच्या शरीरातील रक्त , अन्न रस शोषण करतात. त्यामुळे जनावरांची प्रतिकारक शक्ती कमी होते. अशा जनावरांना टोचलेल्या लशींचा प्रभाव कमी होतो. रोग प्रतिकारक शक्तीत वाढ करण्याचे उपाय
लसीकरणाबाबत महत्त्वाचे मुद्दे
इतर उपाय योजना रोगासाठी तपासण्या जनावरांना होणारे ठराविक रोग, जनावरांसाठी व मानवासाठी घातक आहेत. असे रोग जनावरांना झाल्यास अशी जनावरे आपल्या कळपातून काढून टाकावीत. कासदाह सुप्त प्रकारामध्ये या रोगाचे कोणतेच लक्षण दिसून येत नाहीत. नंतर त्याचे रूपांतर दृश्य स्वरूपाच्या प्रकारात होते. तेव्हा कासेतून खराब दूध येते अशा वेळी औषधोपाचारावर होणारा खर्चही खूप असतो. संपर्क- डॉ.बी.सी.घुमरे, ९४२१९८४६८१ डॉ.बी.एन.आंबोरे, ९४२१३८५४२९ (क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ, जि.सातारा येथे कार्यरत आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.