माशांपासून प्रथिने अत्यंत सहज उपलब्ध होत असल्याने, भूक आणि पोषणाची कमतरता कमी करण्यासाठी आरोग्यदायी पर्यायांपैकी एक आहे. मासेमारी आणि मत्स्य संवर्धनामध्ये रोजगार आणि उत्पन्न वाढवण्याची चांगली क्षमता आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे BFSc पदवीधर हे MFSc साठी विविध विषयांतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये (ॲक्वा कल्चर, फिशरीज रिसोर्स मॅनेजमेंट, ॲक्वाटिक इन्व्हायर्न्मेंटल मॅनेजमेंट, फिश जेनेटिक्स आणि ब्रीडिंग, फिश न्यूट्रिशन आणि फीड टेक्नॉलॉजी, ॲक्वाटिक अॅनिमल अँड हेल्थ मॅनेजमेंट, फिश बायोटेक्नॉलॉजी, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, फिशिंग टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग, फिशरीज इकॉनॉमिक्स, फिशरीज एक्स्टेंशन, फिश फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री) प्रवेश घेऊ शकतात. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे MFSc पदवीधर हे आचार्य पदवीसाठी (पीएच.डी.) जाऊ शकतात. मत्स्य विज्ञान शिक्षण क्षेत्रातील विविध संधी शैक्षणिक/संशोधन संस्थांमध्ये भारती प्रक्रिया राज्य कृषी विद्यापीठ, अॅनिमल अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी आणि फिशरीज युनिव्हर्सिटी अंतर्गत विविध शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये तंत्रज्ञ, कनिष्ठ संशोधन सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, मत्स्यपालन क्षेत्र सहायक, वरिष्ठ संशोधन सहायक, वरिष्ठ तांत्रिक सहायक तसेच सहायक प्राध्यापक पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. वैज्ञानिक कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळातर्फे वैज्ञानिकांच्या भरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात. परीक्षा आणि मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होणारे उमेदवार भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत विविध कृषी आणि मत्स्यपालन संस्थांमधील शास्त्रज्ञ पदावर रुजू होतात. वरिष्ठ तांत्रिक अधिकारी एआरएस परीक्षेद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत विविध मत्स्यपालन संस्थांमध्ये वरिष्ठ तांत्रिक अधिकारी पदे भरली जातात. राज्य सरकारच्या विविध संस्थांमध्ये भरती मत्स्य व्यवसाय विभाग सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (AFDO), मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (FDO), मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी (FTO), मत्स्य व्यवसाय विभाग (DoF), महाराष्ट्रातील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त (ACF). महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान राज्य/जिल्हा/तालुका मिशन व्यवस्थापक आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियान कार्यक्रमातील इतर पदे.
केंद्र सरकारच्या संस्थांमध्ये संधी सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए), फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया (एफएसआय), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (एनआयओ) सारख्या केंद्र सरकारच्या एजन्सीमध्ये तांत्रिक अधिकारी किंवा संशोधन अधिकारी. निर्यात तपासणी संस्था, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ. बँकिंग क्षेत्र राष्ट्रीयीकृत, सहकारी आणि तसेच खासगी बँकांमध्ये कृषी आणि संबंधित क्षेत्रातील विशेषज्ञ अधिकारी, कृषी अधिकारी, व्यवस्थापक / सहायक व्यवस्थापक हे पद. कृषी विज्ञान केंद्र BFSc. पदवीधरांसाठी कार्यक्रम सहायक, आणि फार्म मॅनेजरचे पद. MFSc. साठी पदवीधर आणि विषय विषय विशेषज्ञ. लोकसेवा आयोग इतर पदवीधरांप्रमाणे BFSc राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पदवीधर देखील पात्र आहेत. बाह्य अर्थसाह्यित प्रकल्प BFSc आणि MFSc पदवीधर बाह्य अर्थसाह्यित प्रकल्पांमध्ये कंत्राटी आधारावर संशोधन सहायक / कनिष्ठ संशोधन फेलो / वरिष्ठ संशोधन फेलो / संशोधन सहयोगी या पदासाठी अर्ज करू शकतात. परदेशी नोकरीची संधी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, चीन, युरोपीय देश, आफ्रिकन देश, थायलंड, व्हिएतनाम आणि आखाती देशातील मत्स्यपालन आणि प्रक्रिया क्षेत्रात मत्स्यपालन व्यावसायिकांना संधी आहे. खासगी क्षेत्र सीफूड प्रक्रिया आणि निर्यात युनिट्समधील तंत्रज्ञ, व्यवस्थापक, पर्यवेक्षक, ॲक्वा फीड प्लांट, फिशिंग गियर इंडस्ट्रीज, फार्मास्युटिकल कंपन्या, फिश प्रोसेसिंग प्लांट्स, ॲक्वाकल्चर फार्मर्स (फिश / कोळंबी / शोभेच्या फिश फर्म), ॲक्वा हॅचरी, फार्म डिझाईनिंग आणि बांधकाम, ॲक्वा फार्म आणि हॅचरीचे व्यवस्थापन या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. स्वयंरोजगाराच्या संधी मासे, कोळंबी संवर्धन एखाद्याकडे तलाव असेल तर मासे, कोळंबी संवर्धन हे उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत होऊ शकतो. मासे/कोळंबीची पिले तलावात साठवून ठेवता येतात. शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केल्यास अधिक उत्पन्न मिळते. इच्छुक व्यक्ती भाडेतत्त्वावर तलाव घेऊ शकतात किंवा बांधू शकतात. बायोफ्लॉक कल्चर यामध्ये जलसंवर्धन प्रणालीमध्ये मर्यादित किंवा शून्य पाण्याच्या देवाणघेवाणीसह उच्च साठवण घनता, सतत वायुविजन आणि बायोफ्लॉक तंत्रज्ञान वापरले जाते. हे तिलापिया, कार्प्स, कोळंबी आणि कॅटफिशच्या संवर्धनासाठी उपयुक्त आहे. ॲक्वा पोनिक्स ॲक्वापोनिक्स प्रणालीमध्ये पालक, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर इत्यादी लहान वनस्पतींसह मासे संवर्धन केले जाऊ शकते. या वनस्पतींमध्ये मातीशिवाय संवर्धन केले जाते. येथे माशांचे मलमूत्र वनस्पतींसाठी पोषक म्हणून कार्य करते. लहान जागेत मासे आणि वनस्पती या दोघांचेही संवर्धन करता येते. मत्स्यालय निर्मिती मत्स्यालय हे घराचे सौंदर्य खुलवते तसेच मन:शांती देते. मत्स्यालयाचा आकार वेगवेगळ्या प्रजातींनुसार आणि घरात उपलब्ध जागा यानुसार बदलतो. मत्स्यालयाच्या सेटिंगसाठी एरेटर, पंप, फिल्टर, कृत्रिम खेळणी आणि रोपे, पोस्टर, हूड इत्यादींसारख्या अनेक उपकरणांची आवश्यकता असते. मत्स्य खाद्य उत्पादन मत्स्यपालन प्रणालीसाठी खाद्य हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. एकूण उत्पादन खर्चाच्या जवळपास ६० टक्के खर्च खाद्यावर होतो. सद्यःस्थितीत माशांची संवर्धनाची घनता जास्त आहे. अशा परिस्थितीत, खाद्य महत्त्वाची भूमिका बजावते. माशांच्या वेगवेगळ्या अवस्था आणि आकारानुसार खाद्य वेगवेगळ्या आकारात तयार करता येते. तर, खाद्य उत्पादनामुळे स्वयंरोजगाराला व्यापक वाव मिळतो. ॲक्वा क्लिनिक माशांवर उपचार आणि पाणी, मातीच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी ॲक्वा क्लिनिक उभारणीमध्ये संधी आहे. यासाठी लहान जागा आणि सामू मीटर/पेपर, डीओ टेस्टिंग किट, अमोनिया टेस्टिंग किट, थर्मामीटर, केमिकल्स इत्यादी यासारख्या काही गोष्टी आवश्यक आहेत. सल्ला आणि सेवा मत्स्यपालनाशी संबंधित विविध बाबी, जसे की मत्स्यरोग निदान आणि उपचार, मत्स्यपालन तंत्र, पाण्याची गुणवत्ता व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन इत्यादींबाबत मत्स्यपालकांना माहिती देण्याची सुविधा आहे. पदवीधर सल्लागार असे युनिट सुरू करू शकतो. मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने माशांपासून विविध उत्पादने बनवून त्यांचे मूल्यवर्धन करता येते. कोळंबी/फिश लोणचे, फिश वडा, फिश शेव, फिश पापड, फिश चकली, जवळा चटणी, फिश कटलेट, फिश समोसा, फिश फिंगर इत्यादी विविध मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने लहान स्तरावर माशांपासून तयार केली जाऊ शकतात आणि ती बऱ्याच कालावधीपर्यंत साठवणूक केली जातात. शोभिवंत मत्स्यपालन आणि विक्री
संपर्क : डॉ. शार्दूल गांगण, ८२७५२७०१६७ (तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.