वाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी प्रतिकारके शरीरात तयार होण्यासाठी जे जीवनसत्त्व आणि खनिजांची आवश्यकता असते ते उपलब्ध न झाल्यामुळे कोंबड्यांच्या शरीरामध्ये प्रतिकारके निर्माण होण्यास अडथळा येतो. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यातील व्यवस्थापनात बदल करावेत. सध्या तापमानाची पातळी वाढत चालली आहे. वाढलेल्या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. याचा परिणाम म्हणून शरीरातील ऊर्जा व पाण्याचा ऱ्हास होतो. त्यामुळे कोंबड्या उष्माघातास बळी पडतात. अशा परिस्थितीत ब्रॉयलर कोंबड्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. ज्या वेळी कोंबड्यांच्या सभोवतालचे तापमान ३८ अंश सेल्सिअस ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, त्या वेळी त्यांना वाढलेल्या तापमानाचा त्रास जाणवू लागतो. ब्रॉयलर कोंबड्यांच्या वाढीसाठी १८.३३ अंश सेल्सिअस ते २३ अंश सेल्सिअस हे योग्य तापमान आहे. या तापमानामध्ये कोंबड्यांची वाढ योग्य प्रमाणात होते. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमानाचे कोंबड्यांच्या शरीरावर अपायकारक परिणाम होऊ शकतात. कोंबड्यांमध्ये घामग्रंथी नसतात, त्यामुळे शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कोंबड्या जास्तीत जास्त पाणी पितात. खूप जास्त प्रमाणात असलेल्या तापमानासोबत जुळवून घेण्यासाठी कोंबड्या शरीराची हालचाल कमी करतात. पंख पसरून बसतात. अति तापमानामध्ये कोंबड्या चोच उघडी ठेवून जास्तीत जास्त उष्णता बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये शारीरिक ऊर्जेचा ऱ्हास होतो. जेव्हा जेव्हा वातावरणातील तापमान १ अंश सेल्सिअसने वाढते (२० ते ३० अंश सेल्सिअसच्या मध्ये) तेव्हा कोंबड्या १ ते १.५ टक्क्यापर्यंत कमी खाद्य खातात. तसेच जेव्हा तापमान ३२ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते, तेव्हा त्यांचे खाद्य खाण्याचे प्रमाण ५ टक्के कमी होते. याचाच अर्थ असा, की कमी खाद्य ग्रहणातून कोंबड्यांना मिळणारी पोषणतत्त्वे जसे की प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे यांची पूर्तता होत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर तसेच प्रतिकारशक्ती निर्मितीवर होतो. वाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारे प्रतिकारके शरीरात तयार होण्यासाठी, जी जीवनसत्त्व आणि खनिजांची आवश्यकता असते ते उपलब्ध न झाल्यामुळे शरीरामध्ये प्रतिकारके निर्माण होण्यास अडथळा येतो. यामुळे उन्हाळात कोंबड्यांना जास्त प्रमाणात त्रास होतो. वाढलेल्या उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना पोल्ट्री फार्मचे नियोजन
पाण्याचे नियोजन
खाद्याचे नियोजन
- डॉ. श्रद्धा राऊत, ९२७०७०६००३ (पशुपोषण आहारशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.