शाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञान

स्थानिक पातळीवर गिनी,तितारी आणि चित्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये गिनेवा फाऊल असे म्हणतात. हे पक्षी कोंबडीपालनाला पर्यायी आणि तुलनेने कमी खर्चामध्ये वाढवणे शक्य आहे. स्थानिक वातावरणामध्ये परसबागेमध्येही सहजतेने वाढवणे शक्य असलेल्या या पक्ष्यांचे पालन हे मांस आणि अंड्यासाठी केले जाते.
Guinea bird with chicks.
Guinea bird with chicks.
Published on
Updated on

स्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये गिनेवा फाऊल असे म्हणतात. हे पक्षी कोंबडीपालनाला पर्यायी आणि तुलनेने कमी खर्चामध्ये वाढवणे शक्य आहे. स्थानिक वातावरणामध्ये परसबागेमध्येही सहजतेने वाढवणे शक्य असलेल्या या पक्ष्यांचे पालन हे मांस आणि अंड्यासाठी केले जाते. उत्तर प्रदेशातील इज्जतनगर येथील केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेतील संशोधकांनी तितारी (इंग्रजी नाव गिनेवा फाऊल) या पक्ष्यांच्या पालनातील मर्यादा दूर करण्यात यश मिळवले आहे. त्यांनी विकसित केलेल्या अधिक प्रकाश कालावधी आणि अधिक पोषक संतुलित आहार पद्धती यांच्या एकत्रित तंत्रामुळे ९० ते ११० हंगामी अंडी उत्पादनाच्या तुलनेत १८० ते २०० अंडी उत्पादन घेणे शक्य झाले आहे. हा स्थानिक पक्षी कमी खाद्य खर्चामुळे परसबागेमध्ये पाळणे आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पक्ष्यांना इंग्रजीमध्ये गिनेवा फाऊल असे म्हणतात. हे पक्षी कोंबडीपालनाला पर्यायी आणि तुलनेने कमी खर्चामध्ये वाढवणे शक्य आहे. स्थानिक वातावरणामध्ये परसबागेमध्येही सहजतेने वाढवणे शक्य असलेल्या या पक्ष्यांचे पालन हे मांस आणि अंड्यासाठी केले जाते. या पक्ष्याचे मांस हे जीवनसत्त्वाने परिपूर्ण असून, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. चव आणि पोषकता यामुळे आरोग्यासाठी जागरूक ग्राहकांकडून मोठी मागणी असते. या पक्ष्यांचे पालन पर्यावणपूरक असून, शेतीतील कीड नियंत्रणासाठीही उपयुक्त ठरते. यापासून हंगामी अंडी उत्पादन मिळते. वर्षातील मार्च ते सप्टेंबर या काळामध्ये सरासरी ९० ते ११० अंडी मिळतात. व्यावसायिक गिनेवा फाऊल उत्पादनामध्ये हंगामी अंडी उत्पादन व पुनरुत्पादन ही काही अंशी मर्यादा ठरू शकते. बरैली, उत्तर प्रदेश येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर यांनी या पक्ष्यांची हंगामी पुनरुत्पादन साखळी तोडण्याच्या दृष्टीने संशोधन केले आहे. त्यांनी त्यासाठी २०१६ ते २०२१ या काळात थंडीच्या महिन्यांमध्ये ( नोव्हेंबर ते फेब्रुवारी) गिनेवा फाऊल या पक्ष्याच्या पर्ल या जातीवर चार प्रायोगिक चाचण्या केल्या. त्यासाठी त्यांनी प्रथम अंड्यावर येण्याचा काळ कमी करणे, अंडी घालण्याचा कालावधी वाढवणे आणि एकूणच अंडी उत्पादनाचा दर्जा सुधारणे या तीन उद्देशाने काम सुरू केले. असे झाले प्रयोग

  • संस्थेने पक्ष्यांच्या आहारामध्ये विशेषतः त्यातील प्रथिने, इ जीवनसत्त्व , सेलेनियम यांच्या प्रमाणामध्ये काही बदल करून प्रयोग सुरू केले. वाढीच्या काळामध्ये प्रकाशाचा कालावधीचे व्यवस्थापन केले. यातून हंगामी कालावधीमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला.
  • १४ आठवड्याचे पक्षी पिंजऱ्यामध्ये एका खोलीमध्ये बंदिस्त केले. तिथे तीन आठवडे ठेवून रुळल्यानंतर प्रकाशाचा कालावधी बदलण्यास प्रारंभ केला. त्यानंतर आहारात बदलाला सुरवात केली. नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशाच्या साह्याने प्रकाशाचा कालावाधी अठरा तासांपर्यंत वाढवला. कृत्रिम प्रकाशासाठी त्यांनी तीन फूट उंचीवर ६० वॉट क्षमतेचे बल्ब ठराविक अंतरावर लावले. त्यातून ५.८० लक्स इतक्या तीव्रतेचा प्रकाश उपलब्ध होईल असे पाहिेले. दिव्यांच्या नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणेचा वापर केला.
  • मका, सोयाबीन, मत्स्यचुरा, चुनखडी, डिसीपी, मीठ, डिएल मेथिओनिन, टीएम प्रिमिक्स, व्हिटॅमिन प्रीमिक्स, बी कॉम्प्लेक्स, कोलिन क्लोराईड, टॉक्सिन बायंडर, ई जीवनसत्त्व आणि सेलेनिअम इत्यादी घटकांचा आहारामध्ये समावेश केला.
  • निष्कर्ष  चार वेळा केलेल्या प्रयोगामध्ये वेगवेगळा प्रकाश काळ आणि आहार घटक ठेवून अधिक कार्यक्षम पद्धती शोधण्यात आली. त्यातील

  •  १८ तासाचा प्रकाश कालावधी आणि २० टक्के प्रथिने, प्रति किलो आहारामध्ये १२० मिलिग्रॅम ई जीवनसत्त्व आणि सेलेनिअम ०.८ मिलिग्रॅम प्रति किलो खाद्य या पद्धतीने पालन केल्या पक्ष्यातील पुनरुत्पादन संप्रेरकांना चालना मिळते. त्यांच्या पासून हिवाळ्यांमध्ये अंडी उत्पादनाला सुरवात होते.
  •  २१ आठवडे वयामध्येच पक्ष्यांचे उत्पादन सुरू झाले. पहिल्या अंड्याचा कालावधी १५ आठवड्यापर्यंत कमी झाला. हा सामान्य
  • कालावधी पूर्वी ३६ आठवडे इतका होता.
  •  पक्ष्यांचे अंडी उत्पादन हिवाळ्यामध्ये ५३ ते ५६ टक्के दिवसापर्यंत आले. वार्षिक अंडी उत्पादन १८० ते २०० इतके झाले.
  •  ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ( जानेवारी ते फेब्रुवारी) उबवलेल्या अंड्यातील फलन क्षमता ७१ टक्के आणि उबवणक्षमता ७६ टक्के इतकी चांगली असल्याचे दिसून आले.
  • वरील पद्धतीने पक्ष्यांचे पालन केल्यास हंगामी पुनरुत्पादन साखळी तोडून अधिक अंडी उत्पादन मिळवणे शक्य होते. परिणामी अधिक पिल्ले मिळवता आल्याने पक्षीपालन अधिक फायदेशीर होते. शेतकऱ्याच्या शेतावरही आले यश

  • बिहार राज्यातील मेहसी (जि. मोतीहारी) येथील तरुण शेतकरी सर्फराज अहमद यांनी २०१८ मध्ये गिनेवा फाऊल पक्ष्यांचे पालन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केले. त्यात या नव्या पद्धतीचा अवलंब केला. त्यांच्या फार्ममध्ये १००० गिनेवा पक्ष्यांचे पालन केले. त्यातून प्रति वर्ष ३ ते ४ पट अधिक उत्पन्न मिळवणे शक्य झाले. फलित अंडी, पिल्ले आणि जिवंत पक्षी यांची विक्री प्रामुख्याने ईशान्येकडील राज्ये आणि पश्चिम बंगालमध्ये करण्यात आली.
  • गिनेवा फाऊल पालनातील मर्यादा दूर करण्यात नव्या तंत्रज्ञानामुळे यश आले आहे. यातून परसबागेतील कोंबडीपालनाला उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकेल.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com