
जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात. प्रत्येक जनावराला त्याच्या शारीरिक स्थितीनुसार आहार देणे आवश्यक असते. आहारामध्ये वैरण, हिरवा चारा, खनिज पदार्थ, जीवनसत्वे, पाणी यांचा समावेश असावा. पावसाळी दिवसांमध्ये मुख्यतः हिरवा चारा जनावरांना जास्त प्रमाणात दिला जातो. परंतु जनावरांना हिरवा आणि वाळलेला चारा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. देशी गाईंना २ ते २.५ टक्के तर म्हशींना व संकरित गाईंना त्यांच्या वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थाची गरज असते. जनावरांचे वजन, वय, उत्पादन क्षमता, विविध शारीरिक क्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व अन्नघटकांना योग्य प्रमाणात एकत्र मिसळणे यास संतुलित आहार असे म्हणतात. आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे मिश्रण असणे आवश्यक आहे. जनावरांच्या आहार प्रमाणात व घटकांत अचानक बदल करू नये. संतुलित आहार
संकरित गाईसाठी आहार खालील मात्रा ही साधारणपणे ५०० किलो शारीरिक वजन आणि १५ लिटर दूध देण्याऱ्या गाईसाठी आहे.
संतुलित पशुखाद्य बनविण्याचे तंत्र : प्रमाण १०० किलोसाठी) दुग्धोत्पादनामध्ये जादा खर्च हा पशुआहारावर होतो. पशुखाद्यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, डाळींच्या चुणी तसेच सरकी पेंड, सोयाबीन पेंड, भुईमूग पेंड, गव्हाचा किंवा तांदळाचा कोंडा यांचा योग्य प्रमाणात वापर करून पशुखाद्य तयार करता येते. मका भरडा.......३५ किलो शेंगदाणा पेंड.....२८ किलो टरफले/भुसा(गहू,हरभरा,डाळी,भात).....३४ किलो खनिज मिश्रण.....२ किलो मीठ.....१ किलो हिरव्या चाऱ्याचे महत्त्व
- डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४ (पशूपोषण शास्त्र विभाग, बारामती ॲग्रो लिमिटेड,बारामती,जि.पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.