

जनावरांच्यामध्ये जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास अनेक पर्याय निवडावेत.तीन ते चार वेळेच्या डिवर्मिंगनंतर जंतनाशकाचा गट बदलून नवीन गटातील जंतनाशक वापरावे. यासाठी पशुतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. एकच एक प्रकारचे जंतनाशक डिवर्मिंगसाठी अनेक वेळेस वापरल्याने प्रतिकारशक्ती तयार होते. विशेषतः त्याच वर्गातील जंतनाशक सातत्याने वापरले जाते. जंतनाशकाची मात्रा परजिवीचा प्रजाती, पशुवैद्यकांचे मार्गदर्शन व परजिवीचा प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता लक्षात न घेता सातत्याने चुकीचे जंतनाशक वापरले जाते. जंतनाशकाची योग्य प्रमाणामध्ये मात्रा न देता कमी प्रमाण, जास्त प्रमाण, कित्येक पटीने गरजेपेक्षा जास्तीचा वापर, न लागू होणारे जंतनाशक वापरल्याने प्रतिकारशक्ती तयार होते. जंताचा प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असूनदेखील जंतनाशकाचा सातत्याने वापर, जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असताना इतर पर्यायी बाबींचा विचार न करणे आणि विशिष्ट जंतांच्या प्रजातीस लागू न होणारे जंतनाशक वापरल्यानेदेखील प्रतिकारशक्ती वाढीस लागली आहे. शेळी-मेंढीमध्ये "हिमॉन्कस कॉन्टूरटस' हे रक्त शोषण करणारे जंत अनेक जंतनाशकाच्या प्रती आजच्या मितीस प्रतिकारशक्ती वाढवून तयार झाले आहेत. म्हणून त्यांच्यावर बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या अनेक जंतनाशकांचा त्यांच्यावर परिणाम दिसून येत नाही. करावयाचे उपाय
जंत प्रादुर्भाव झाल्याची तीव्रता कमी असल्यास खालील पर्याय निवडावेत.
जंतनाशकांचे वर्गीकरण जंतनाशके ही रासायनिक आहेत. जंतावर कशा प्रकारे क्रिया होते व ते जंतांना पक्षाघात (पॅरालिसिस) करतात. जनावरांच्या शरीरामधून बाहेर काढतात. या क्रियेनुसार जंतनाशकांचे प्रमुख दोन वर्ग आहेत. पहिला वर्ग जंताची ऊर्जा निर्माण करणे किंवा चयापचय क्रियेवर आघात करणारी आणि त्याद्वारे त्यांना विकलांग करून शरीराबाहेर काढणारी जंतनाशके ः
दुसरा वर्ग जंताचा मज्जातंतू व स्नायूंवर आघात करून त्यांना विकलांग बनवून शरीराबाहेर काढणारी जंतनाशके
तिसरा वर्ग परजीवींच्या बाह्य आवरणामध्ये इजा करून त्यांना नष्ट करतात. उदा. प्राझिक्वेन्टाल. जंतनाशकांच्या वर्गीकरणाचा फायदा एकच प्रकारचे जंतनाशक सततच्या डीवर्मिंगसाठी वापरल्यास त्याच्याप्रती संवेदना कमी होऊन परजीवी त्याच्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करतात. म्हणून वेगवेगळ्या वर्गातील जंतनाशके वापरणे आवश्यक ठरते.
संपर्क : डॉ. बाबासाहेब नरळदकर - ९४०३८४७७६४ डॉ. गजानन चिगुरे - ९७६१९६४९९९ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.