वराहपालन सुरू करताना...

वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून घेण्यासाठी आर्थिक गुणवत्तेची छोटीशी चाचणी घ्यावी. त्यानंतरच या व्यवसायाला सुरवात करावी.
Improved breeds should be selected for pig rearing.
Improved breeds should be selected for pig rearing.
Published on
Updated on

वराहपालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून घेण्यासाठी  आर्थिक गुणवत्तेची छोटीशी चाचणी घ्यावी. त्यानंतरच या व्यवसायाला सुरवात करावी. पारंपरिक पशुपालनाच्या बरोबरीने  बाजारपेठेची मागणी लक्षात घेता आपल्याकडे काही प्रमाणात वराहपालन व्यवसायाला सुरुवात झाली आहे. वराहांचा गर्भधारणा कालावधी  ११४ दिवसांचा असतो. एकाच वेळी ७ ते १५ पिले मिळण्याची  शक्यता असते. सहा महिन्यात मांस उत्पादनासाठी वराह तयार होतात. वराहांना घरगुती टाकाऊ अन्न, हॉटेल, खाणावळी, समारंभातील उरलेल्या अन्नाचा वापर खाद्य म्हणून करता येतो. उत्तम मांस - हाडे यांचे गुणोत्तर (७०%) आहे.  बाजारात मांस, फॅट (लार्ड), चामड्याला मागणी आहे. या जरी व्यवसायाच्यादृष्टीने उपयुक्त बाजू असल्या तरी आपल्याकडील भांडवल, मनुष्यबळ, व्यवस्थापन तंत्र आणि विक्रीचे नियोजन या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. योग्य जागा 

  • सर्वसाधारणपणे शहरा जवळील पट्ट्यात  वराहपालनासाठी शेड उभारावी. जेणेकरून  जवळपासच्या बाजारात  वराह मांससाठी  अधिक मागणी असेल. हॉटेल, वसतिगृहे आणि खाणावळी, धाबे  इत्यादीमधील उर्वरित अन्न हे वराह पोसण्यासाठी उपलब्ध असेल. 
  • वराह फार्म थोड्या उंच सपाट ठिकाणी असावा.पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य यंत्रणा तसेच वीज, पाणी, रस्ते यांची सुविधा असावी.  
  • वराह हे बहू-प्रजनक आहेत. मोठ्या संख्येने व वेगाने वाढणारे पशुधन आहे, म्हणून भविष्यात वाढ करता येईल अशी जागा असावी.  
  • फार्मवर  स्टोअर, कार्यालये, कर्मचाऱ्यांसाठी खोल्या आणि रस्ते इत्यादींसाठीही पुरेशी जागा असावी. वेगवेगळ्या वयोगटातील वराहांसाठी सर्वसमावेशक  एक प्रणाली असावी. तसेच १० टक्के अधिक जागा असणे आवश्यक आहे.
  • भांडवल आणि खर्चाचे मूल्यमापन  

  • वराह पालनविषयक तांत्रिक आणि आर्थिक क्षमता समजल्यानंतर इच्छुक पशुपालकाला अंदाजित रकमेची व्यवस्था करावी. 
  • शासनाच्या विविध विकास कार्यक्रमांतर्गत वराह संगोपनसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. वराह पालनातून स्वयंपूर्ण होता येईल का, हे जाणून घेण्यासाठी  आर्थिक गुणवत्तेची छोटीशी चाचणी घ्यावी. ही चाचणी प्रामुख्याने तीन गोष्टींवर आधारित आहे, 
  • एकूण उत्पन्न : वराह फार्म  मधील सर्व उत्पादनांची विक्री करुन  मिळणारी एकूण रक्कम पुरेशी आहे का?
  • परतफेड करण्याची क्षमता :  फार्मच्या एकूण उत्पन्नापैकी  काही आंशिक कर्ज परतफेड  घेण्यासाठी भाग राखून ठेवावा.
  • आपत्ती सहन करण्याची शक्ती : अचानक उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती,रोग,मरतूक, मानवनिर्मित आपत्ती, चोरी इत्यादी  कमतरतेचा सामना करण्यासाठी लागणारे भांडवल याची तपासणी केल्यावर योग्य निर्णय घ्यावा.
  •   व्यवसाय नियोजन  

  • जवळच्या बाजारात मांसाची मागणी आणि व्यवसायासाठी योग्य ठिकाण आणि किमतीबद्दल संपूर्ण माहिती आवश्यक आहे. 
  • वराहाच्या जाती (लार्ज व्हाइट यॉर्कशायर, मिडल व्हाईट यॉर्कशायर, बर्कशायर, ड्युरॉक, लँड्रेस भारतीय जाती :  घुंगरू, नियन-मेघा  इत्यादी) याची माहिती घ्यावी.
  • युनिट उभारण्यासाठी लागणारे सामान, वराहाच्या खुराकाची व्यवस्था, अंदाजित गुंतवणूक, शासकीय योजना, कर्ज व्यवस्था इत्यादीं विषयी सविस्तर माहिती. 
  • वराह पालन आणि त्यांचे प्रजनन सुरू करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.
  • व्यवसायाच्या ठिकाणी स्थानिक पशुधनाची स्थिती, या अहवालासाठी संबंधित सर्वेक्षण, पशुगणना अहवाल पहावा. 
  • आहार नियोजन, कुंपण व्यवस्थापनाची वैज्ञानिक पद्धत. व्यवसायातील नफा आणि तोटा यांचे अंदाज. 
  • पशुवैद्यकीय विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, शासकीय पशुसंवर्धन विभाग, संशोधन संस्थांकडून प्रशिक्षण आवश्यक. 
  • - डॉ. धीरज पाटील,  ९५५२१४४३४९ (गुरू अंगद देव पशुवैद्यकीय व पशुविज्ञान विद्यापीठ, लुधियाना, पंजाब)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com