शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची नोकरी सोडून करतोय डेअरी व्यवसाय

जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी एका तरुणानं धाडसी पाऊल उचलल आहे. या तरूणानं त्याची भरघोस पगाराची नोकरी सोडून डेअरी व्यवसाय सुरू केला आहे.
Abineesh Khajuria
Abineesh Khajuria

वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी एका तरुणाने हे धाडसी पाऊल उचलले आहे. या तरूणाने त्याची भरघोस पगाराची नोकरी सोडून डेअरी व्यवसाय (Dairy Bussiness) सुरू केला आहे. आता हा तरूण आयटी कंपनीतली (IT Company) नोकरी सोडून स्वत:चा दूध व्यवसाय करत आहे. अबिनीश खजुरिया (Abineesh Khajuria) असे या तरूणाचे नाव आहे. त्याचा आता जम्मूमध्ये एक मोठा गोठा (Cowshed) आहे.

हेही वाचा - सांगलीत जीपनंतर जुगाड 'मिनी फोर्ड' गाडीचा आविष्कार तिथे जवळपास शंभर एक गाई आहेत. अबिनीशच्या या धाडसी पावलाचा त्याच्या वडिलांनाही सार्थ अभिमान आहे. घरातूनच शेतीचे बाळकडू मिळालेल्या अबिनीशचे वडील कुलभूषण खजुरिया (Kulbhushan Khajuria) यांनी दुग्ध व्यवसायात नाव कमावले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे केवळ ५-६ गायी होत्या. त्यानंतर २०१५ साली त्यांनी १५ गायींपासून दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. सुरूवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी न डगमगता हा आपला व्यवसाय उभा केला. आज त्यांच्याकडे ९७ गायी असून त्यातल्या ४० दुभत्या आहेत. शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा -   आजकालच्या तरूणांचा ओढा अंगमेहनतीपेक्षा चांगला जॉब करण्याकडे असतो. क्वचितच एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा शेती करताना दिसतो. पण मुळात एखाद्या विषयात आवड असेल तर ती व्यक्ती त्या कामाकडे वळते.  कुलभूषण यांचा मुलगा अबिनीश संगणक शास्त्रामध्ये (Computer Science) पदवी घेतल्यानंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. मात्र, त्याचा कल वडिलांच्या दुग्ध व्यवसायाकडे होता. आज तो त्याच्या वडिलांसोबत डेअरीचे कामही सांभाळत आहे. कुलभूषण यांचे वडीलही शेतकरी होते. ज्यांच्याकडून ते शेती शिकले. आता त्यांचा मुलगाही शिकून सवरून शेतकरी झाला आहे. तरूणांना मिळाला रोजगार - अबिनीश काम पाहत असलेल्या डेअरीमुळे जवळपास पंधरा तरुणांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार (Empolyment) मिळाला आहे. मोठ्या संख्येने गोठ्यात गायी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेणखतही मिळते. यापासून ते गांडूळ खत तयार करतात. आज त्यांच्या गोठ्यात एचएप, जर्सी, साहिवाल (Sahiwal) आणि गीर (Gir) जातीच्या गायी आहेत. याशिवाय दैनंदिन कामासाठी मिल्कींग मशिन, (Milking Machine) मिल्क कुलर, (Milk Cooler) रेशन मिक्श्चर मशिन (Ration Mixture Machine) यांसारखी आधुनिक यंत्रे (Modern machinery) त्यांच्याकडे आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com