Animal Breeding : जातिवंत पैदाशीसाठी लिंग वर्गीकृत वीर्यनिर्मिती तंत्रज्ञान

श्‍वेत क्रांतीनंतर पशुपालकांना कृत्रिम रेतन या प्रगत तंत्रज्ञानाचा परिचय झाला. लिंग वर्गीकृत वीर्यनिर्मिती तंत्रज्ञान म्हणजेच सेक्स सोर्टेड सीमेन टेक्नॉलॉजी होय.
Animal Breeding
Animal BreedingAgrowon

श्‍वेत क्रांतीनंतर पशुपालकांना कृत्रिम रेतन (artificial Insemenation) या प्रगत तंत्रज्ञानाचा परिचय झाला. लिंग वर्गीकृत वीर्यनिर्मिती तंत्रज्ञान (Gender classified semen production technology) म्हणजेच सेक्स सोर्टेड सीमेन टेक्नॉलॉजी ( Sex Sorted Siemen Technology ) होय. कृत्रिम रेतनाच्या तंत्रज्ञानातून उत्तम वळूची उपलब्धता विस्तारत गेली. त्याचा फायदा सर्वसामान्य पशुपालकांपर्यंत पोचू लागला आहे.  

Animal Breeding
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान

२० व्या पशुगणनेनुसार (२०१७), महाराष्ट्रात गाई-म्हशींची संख्या ८९.०४ लक्ष इतकी आहे. मात्र त्यातील सुमारे २२-२५ लक्ष पशुधन पैदासक्षम आहे. फक्त अधिक संख्याबळ महत्त्वाचे नसून, उत्पादनाच्या दृष्टीने उपयुक्त पैदासक्षम पशुधन अधिक असणे गरजेचे आहे. आकसत चाललेल्या देशी पशुधनाचे जतन व संवर्धन करणे अधिक आव्हानात्मक आहे.

Animal Breeding
शेळ्यांच्या जातिवंत पैदाशीसाठी कृत्रिम रेतन

या पार्श्‍वभूमीवर, उपलब्ध पशुधनात नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आनुवंशिक सुधारणा करणे क्रमप्राप्त आहे. उत्तम पैदासक्षम नर (वळू) आणि मादी (गाई/ कालवडी) हा पशुसमूहाचा गुणवत्तादर्शक आरसा असतो. अधिक दूध उत्पादनासाठी कळपात उच्च दूधनिर्मिती क्षमता असणाऱ्या माद्यांची संख्या जास्त असणे गरजेचे आहे. मोठ्या कळपाला एखादा सक्षम वळूदेखील पुरेसा ठरतो.

श्‍वेत क्रांतीनंतर पशुपालकांना कृत्रिम रेतन या प्रगत तंत्रज्ञानाचा परिचय झाला. लिंग वर्गीकृत वीर्यनिर्मिती तंत्रज्ञान म्हणजेच सेक्स सोर्टेड सीमेन टेक्नॉलॉजी होय.

कृत्रिम रेतनाच्या तंत्रज्ञानातून उत्तम वळूची उपलब्धता विस्तारत गेली. पशुसंवर्धन विभागांतर्गत कृत्रिम रेतन संस्था, सहकारी दूध संघ, अशासकीय संस्था यांच्या माध्यमातून कृत्रिम रेतन कार्यक्रम राबविण्यात येतो.

Animal Breeding
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी ‘आयव्हीएफ' तंत्र फायदेशीर

सद्यःस्थितीत दरवर्षी सुमारे ४७ लाख कृत्रिम रेतन करून सुमारे १२ ते १३ लाख वासरांची पैदास होते. निसर्गन्यायाने, यातील सुमारे ५०-५० टक्के मादी आणि नर) असतात. लिंग वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचे यश हे वापरकर्त्याचे कौशल्य, पैदासक्षम निरोगी मादी, कृत्रिम रेतनाचा दर्जा, मादीचे ऋतुचक्र व माज, पोषण, रोगनियंत्रण अशा अनेक घटकावर अवलंबून आहे.

सेक्स सोर्टेड सीमेन तंत्रज्ञान ः
प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील पशुधनाची दुग्धोत्पादन क्षमता कमी आहे. जागतिक पातळीवर भारतीय पशुधन केवळ संख्येने अधिक (गाई- ३१ टक्के आणि म्हशी- ५४ टक्के) असल्याने एकूण दूध उत्पादन अधिक भासते.

त्यासाठी अधिकाधिक कालवडी आणि कमीत कमी नर (गोऱ्हे) पैदासित होण्यासाठी सेक्स सोर्टेड सीमेन तंत्रज्ञानावर भर देण्याची आवश्यकता आहे.
 

सामान्यतः वीर्यमात्रेत X किंवा Y दोन्ही रंगसूत्रे असलेले शुक्राणू असतात. बीजाण्ड (Ova) आणि शुक्राणू (Sperm) यांच्या फलनातून भ्रूण आकाराला येत असते. सर्व बीजाण्डे X गुणसूत्रे धारक असतात. जेव्हा X रंगसूत्रेधारक शुक्राणू बीजांडसह मिलन पावतात तेव्हा XX म्हणजे मादी (कालवड) जन्माला येते.

जेव्हा Y रंगसूत्रेधारक शुक्राणू बीजांडसह मिलन पावतात, तेव्हा XY म्हणजे नर (गोऱ्हे) जन्माला येते. कृत्रिम रेतन केल्यावर कालवड व्हावी ही अपेक्षा पशुपालकांना असली, तरी बीजाण्ड कुठल्या (X किंवा Y) रंगसूत्रेधारक शुक्राणूसह मिलन पावत आहे ही नैसर्गिक प्रक्रिया असते.

प्रयोगशालेय स्तरावर X व Y लिंगनिश्‍चिती करणारी गुणसूत्रे अल्बुमिन ग्रेडियंट, HY अँटीजेन, फ्री फ्लो इलेक्ट्रोफोरेसिस, लिंगविनिश्‍चित प्रथिने ओळखणे अशा अनेक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शुक्राणूंचे विभाजन करता येते.

मात्र मोठ्या प्रमाणावर X शुक्राणूंचे Y शुक्राणूपासून विभक्त करण्यासाठी फ्लो सायटोमेट्री पद्धत अधिक उपयुक्त ठरते.

सूक्ष्मरीत्या X किंवा Y रंगसूत्रात फरक करणे अवघड आहे. तथापि, X रंगसूत्रात Y रंगसूत्रापेक्षा DNA चे प्रमाण अधिक (४ टक्के) असते. तेव्हा, फ्लो सायटोमेट्री या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत, X व Y या रंगसूत्रेधारक शुक्राणू ओळखून वेगळे करता येतात.

या तंत्रात, शुक्राणू एका विशिष्ट रंगाने (Dye) डागले जातात, जे थेट डीएनएला जोडतात. फ्लो सायटोमेट्री तंत्रात शुक्राणूवर लेसर प्रकाशशलाका वापरून अधिक डीएनए असलेले X रंगसूत्रे तुलेनेने Y रंगसूत्रापेक्षा अधिक चमकतात.
 

संगणकाच्या मदतीने धनप्रभारीत X गुणसूत्रांना ऋणप्रभारीत Y गुणसूत्रापेक्षा टॅग करत इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधून पार केले जातात. हे तंत्रज्ञान दोन दशकांपूर्वी अमेरिकेत विकसित झाले आहे. जगातील प्रगत डेअरी फार्मवर याचा वापर केला जातो. भारतात पश्‍चिम बंगाल येथे या तंत्राच्या साह्याने निर्मित ‘श्रेयश’ नावाचे वासरू २०११ मध्ये जन्माला आले.
 

सद्यःस्थितीत महाराष्ट्रात सेक्स सोर्टेड सीमेन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नामांकित कंपनी आणि बिगरशासकीय दूध संघ/ डेअरी फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने गीर, साहिवालसारख्या देशी गोवंशाच्या लिंग वर्गीकृत वीर्यनळ्या निर्मिती सुरू आहेत.

विविध खासगी बिगरशासकीय संस्था यांच्याकडूनही सेक्स सोर्टेड सीमेन निर्मिती प्रयोगशाळांची उभारणी होत आहे. तसेच शासकीय पातळीवर, राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत लिंग वर्गीकृत वीर्यमात्रेचे उत्पादन व पुरवठा होत आहे.
 

या तंत्रज्ञानाचा वापर केवळ कालवडी म्हणजे माद्या निर्मितीसाठीच होऊन नैसर्गिक नर, मादी गुणोत्तर बिघडले जाईल अशी शंका बाळगण्याची गरज नाही. विविध प्रयोगशाळांच्या वतीने क्षेत्रीय स्तरावर या तंत्रज्ञानाच्या वापरातून सुमारे ९० टक्के मादी वासरे प्रसवण्याची हमी दिली जात असली तरी याची शाश्वत पडताळणी सुरू आहे.

याच अनुषंगाने लिंग वर्गीकृत वीर्य प्रक्षेत्रावर वापरातून नर व मादी वासरे मिळण्याचे प्रमाण स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला (महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यान विद्यापीठ, नागपूर) येथे एका प्रकल्पांतर्गत पडताळले असता, गायींमध्ये मादी वासरे जन्माला येण्याचे प्रमाण सुमारे ९१.३० टक्के आढळून आले आहे.

लिंगवर्गीकृत वीर्यमात्रा वापरून उचित फलनदर
मिळण्यासाठी घ्यावयाची  खबरदारी  ः
  कृत्रिम रेतनासाठी निरोगी गाई किंवा म्हशी, सशक्त शरीर रचना, उत्तम प्रजननदर आणि नियमित ऋतुचक्र, माज दर्शविणाऱ्या गाई-म्हशींना प्राधान्य द्यावे.
 

रेतन करणारा व्यक्ती हा कुशल आणि अनुभवी असावा.
  वीर्यमात्रा साठवणूक, हाताळणी, वहन आणि सामान्य तापमानास आणणे (थाईंग) आदी बाबी अत्यंत काटेकोरपणे कराव्यात.
  कृत्रिम रेतन करताना माजाची लक्षणे, पशुचे आरोग्य आणि व्यवस्थापन याची चाचपणी करावी.

तंत्रज्ञानाचे फायदे ः
  अपेक्षित नर किंवा मादी वासरे पैदास करणे शक्य.
  कळपातील पैदासक्षम माद्यांची संख्या जलद गतीने वाढविण्यासाठी उपयुक्त.
  नर आणि मादी यांचे कळपातील गुणोत्तर ९:१ या प्रमाणात राखणे शक्य.
  प्रसूतीदरम्यान नर वासरांमुळे होणारा कष्टप्रसव गायीत होण्याचा संभव कमी.
 

मादीसह उत्तमोत्तम नर (वळू) पैदाशीसाठी देखील उपयुक्त.
  संतती परीक्षण कालावधी घटल्याने कमी खर्चात आनुवंशिक सुधारणा वेगाने करण्यास मदत.
  अधिक आनुवंशिक मिळकत होण्यासाठी निवड प्रक्रियेत निकषांवर जोरकसपणे सुधारणा करणे शक्य.

तंत्रज्ञानाच्या मर्यादा ः
  निर्मिती खर्च अधिक.
  कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाने माद्या गाभण राहण्याचा दर न्यूनतम.
  व्यावसायिक स्तरावर तंत्रज्ञानाची अनुपलब्धता.
  प्रशिक्षित कुशल रेतकाचा अभाव.

डॉ. प्रवीण बनकर,  ९९६०९८६४२९
डॉ. श्याम देशमुख,  ९६५७७२५७९०


(डॉ. बनकर हे पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग आणि डॉ. देशमुख हे पशुप्रजनन व प्रसूतिशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे  सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com