डॉ. श्रीकांत खुपसे, एस. एस. जंजाळपशुपालन हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पूरक व्यवसाय बनला आहे. अनेक ठिकाणी तो मुख्य व्यवसाय म्हणूनही केला जातो. अशा स्थितीमध्ये जनावरांची आरोग्य टिकविण्यासोबतच दूध उत्पादनात वाढ मिळविण्याची गरज असते. त्यासाठी जनावरांना संतुलित व पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. जनावरांच्या आहारात हिरवा आणि सुका चारा योग्य प्रमाणात असणे गरजेचे असते. या दोन्ही प्रकारच्या चाऱ्यांना विशेष महत्त्व आहे. .सध्या पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक उपलब्ध होत असला तरी रब्बी आणि उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता भासते. हा हिरवा चारा हा कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे व तंतुमय पदार्थांचा मुख्य स्रोत आहेत. मात्र बहुतेक शेतकऱ्यांना वर्षभर पुरेसा हिरवा चारा उपलब्ध करण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे जनावरांना कोरडा चारा किंवा बाजारातून महागड्या दराने चारा विकत घ्यावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून बहुवार्षिक चारा उपलब्ध करणारी चारा पिके किंवा झाडे आपल्या शेतात असणे गरजेचे असते..Fodder Management : चारा पिकाची कापणी वेळेवर करा; जनावरांचे आरोग्य वाढवा.बहुवार्षिक चारा पिकेएकदा पेरणी केल्यानंतर ३ ते १० वर्षांपर्यंत हिरवा चारा पुरविणाऱ्या पिकांना बहुवार्षिक चारा पिके म्हणतात. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी नांगरणी, पेरणीचा खर्च करावा लागत नाही. दर काही काळानंतर कापणी केल्यास कमी श्रमात अधिक चारा उपलब्ध होतो.चारा नियोजनाची गरजदूध उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी.जनावरांच्या पोषणमूल्यांची गरज पूर्ण करण्यासाठी.चारा खरेदीवरील खर्च मर्यादित ठेवण्यासाठी.कोरडा व हिरवा चारा यांचा समतोल राखण्यासाठी.आपत्कालीन परिस्थितीत उपलब्धतेसाठी..चाऱ्याचे प्रकारवर्षभर चारा नियोजन करताना शेतांमध्ये योग्य विभागणी करून चाऱ्यांचे पोषकतेनुसार विविध प्रकार समाविष्ट करावेत.हिरवा चारा ः ऊर्जा, जीवनसत्त्वे व पाणी पुरवतो. (उदा. नेपियर, गिनी गवत, मका, ज्वारी, बरसीम, ल्युसर्न)कोरडा चारा ः तंतुमय पदार्थांचा स्रोत. (उदा. ज्वारी, गहू, हरभरा, भात पेंढा)सायलेज ः चाऱ्याची साठवणूक व आपत्कालीन वापरासाठी.झाडांचा पाला ः सुबाभूळ, ग्लिरिसिडिया, पांगारा, करवंद यांची पाने प्रथिनांचा उत्तम स्रोत..Fodder Management : असं करा चाऱ्याचं नियोजन ; कमी पडणार नाही चारा.वर्षभर चारा नियोजनपावसाळा (जून ते सप्टेंबर)नेपियर व गिनी गवत लागवड ः सतत चारा पुरवठामका व ज्वारी हिरवा चारा ः पावसाळ्यात भरपूर उत्पादनसुबाभूळ पालाः पूरक प्रथिनांचा स्रोतहिवाळा (ऑक्टोबर ते फेब्रुवारी)बरसीम, ल्युसर्न, ओट लागवडः जास्त प्रथिने असलेला चाराहायब्रीड नेपियर ः नियमित कापणी करता येते.धान्य पिकांचा पेंढा उदा. गहू, हरभराउन्हाळा (मार्च ते मे)नेपियर, गिनी गवत कापणीसुबाभूळ व ग्लिरिसिडिया पालासायलेज साठवणुकीतून वापर.चारा नियोजन तत्त्वेहिरव्या व कोरड्या चाऱ्याचा समतोल राखणे (६० टक्के हिरवा + ४० टक्के कोरडा).दलहन व निदलहन चारा मिश्रण करणे. (जास्त प्रथिने व ऊर्जा).सायलेज व हाय तयार करणे ः आपत्कालीन साठवणीसाठी.झाडांचा पाला वापरणे ः सुबाभूळ, पांगारा, करवंद.स्थानिक परिस्थितीनुसार पिकांची निवड करणे.फायदेसंतुलित व पौष्टिक चारा उपलब्ध.उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ.जनावरांचे आरोग्य सुधारते.पशुपालकांचा खर्च कमी होतो.चारा व्यवस्थापन वैज्ञानिक पद्धतीने होते..निष्कर्षवर्षभर चारा नियोजन हे आधुनिक पशुपालनाचा आधारस्तंभ आहे. हिरवा चारा, कोरडा चारा, दलहन चारा, वृक्षांचा पाला तसेच सायलेज व हाय यांचा योग्य मेळ घातल्यास शेतकरी आपल्या जनावरांना पौष्टिक आहार पुरवू शकतात. आपल्या विभागातील पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तिन्ही ऋतूत योग्य पिके घेणे, साठवण तंत्रज्ञानाचा अवलंब करणे यातून दूध उत्पादन व जनावरांचे आरोग्य दोन्ही टिकवून ठेवता येते.- डॉ. श्रीकांत खुपसे ८६०५५३३३१५(सहाय्यक प्राध्यापक, एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली,जि. छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.