Satara News : येथील श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या डॉक्टरांची बदली होऊन चार महिने उलटले, तरीही त्यांच्या रिक्त जागी नवीन नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सुमारे ३५ किलोमीटरवरील दवाखान्यातील अन्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. .येथे १९७६ पासून श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत आहे. श्रेणी एकच्या आणि अन्य पशुवैद्यकीय दवाखान्यात मिळणाऱ्या उपचार व इतर सुविधांत तफावत असते. उपचाराबरोबरच जनावरांचे शवविच्छेदन, वैद्यकीय दाखले, वन विभागाला प्राणी व पक्ष्यांच्या उपचाराची मदत आणि दाखले देणे, शस्त्रक्रिया, उच्च उपचार, लस साठवणूक, रोगनिदान, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि मार्गदर्शन आदी बाबींसाठी श्रेणी एक दवाखाना उपयुक्त ठरतो. .निवासस्थाने बांधताना जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने दवाखाना दुसऱ्या गावात स्थलांतरित करावा लागतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तत्कालीन जिल्हा परिषदेचे सदस्य रमेश पाटील यांनी याप्रश्नी खास लक्ष घालून ग्रामीण रुग्णालयाजवळची जागा उपलब्ध करून देत सुसज्ज इमारत उभारली. सध्या तिथे श्रेणी एकचा दवाखाना सुरू आहे. .मात्र, चार महिन्यांपूर्वी तेथील पशुवैद्यकीय अधिकारी ऋषिकेश व्हनाळे यांची अन्यत्र बदली झाली. त्यांच्या जागी नवीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली नाही. काही दिवस सुमारे ६० किलोमीटरवरील तारळे येथील अधिकाऱ्यांकडे येथील अतिरिक्त कार्यभार होता. .Veterinary Clinic : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर १० दवाखान्यांचा कारभार.आता तो ३५ किलोमीटरवरील मल्हारपेठ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांकडे सोपविला आहे. मूळ दवाखान्याचे कामकाज सांभाळताना अतिरिक्त जबाबदारी अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी होत आहे..Veterinary Clinic: दौंडमध्ये साकारले पहिले बोलके पशुवैद्यकीय चिकित्सालय .वन विभागाच्या पंचनाम्यातही अडचणीयेथील श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांना उपचाराबरोबर जनावरांचे शवविच्छेदन, वैद्यकीय दाखले, वन विभागाला प्राणी व पक्ष्यांच्या उपचाराची मदत आणि दाखले देणे असे अधिकार आहेत. .मात्र, आता अधिकारीच नसल्याने बिबट्या किंवा अन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जनावर दगावल्यास पंचनाम्यासाठी लागणारे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि जखमी वन्य प्राणी किंवा पक्ष्याच्या उपचारासाठी मल्हारपेठला धाव घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. पशुसंवर्धन विभागाने येथील गैरसोयीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.