Livestock Census : राज्यात आजपासून २१ व्या पशुगणनेस सुरुवात

Animal Care : राज्यात २१ व्या पशुगणनेस सोमवारपासून (ता. २५) सुरुवात होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे.
Livestock Census
Livestock Census Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात २१ व्या पशुगणनेस सोमवारपासून (ता. २५) सुरुवात होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत मोबाइल ॲपच्या माध्यमातून ही पशुगणना करण्यात येणार आहे. पशुपालकांनी पशुगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना आपल्याकडील पशूंची अचूक व योग्य ती माहिती देण्यात यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाचे सहसंचालक सुषमा जाधव यांनी केले आहे.

पशुगणनेच्या माध्यमातून राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रनिहाय कुटुंब, कौटुंबिक उपक्रम, बिगर-कौटुंबिक उपक्रम आणि संस्था, गोशाळा यांच्याकडे असलेल्या राज्यात आढळणाऱ्या १६ पशुधन प्रजाती व कुक्कुट पक्षी यांची जातिनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय आकडेवारी गोळा केली जाणार आहे. ही पशुगणना नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

Livestock Census
Livestock Census Survey : जळगावात पशुगणना सर्व्हेक्षण सुरू

पशुपालन ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये याचे लक्षणीय योगदान आहे. शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकीची आवश्यकता असून ही माहिती गणनेच्या स्वरूपात गोळा केली जाते. पशुधनामध्ये महाराष्ट्र संपन्न राज्य असून देशामध्ये ७ व्या क्रमांकावर आहे.

तसेच कुक्कुट पक्षी यामध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. पशुधनाच्या निरंतर विकासासाठी चांगल्या योजना आखण्यासाठी पशुगणना महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. पशुपालन पूरक उत्पन्ननिर्मिती बरोबरच दूध, अंडी व मांस ही पशुधन उत्पादने पोषक आहाराचा महत्त्वाचा स्रोत आहे.

Livestock Census
Livestock Census : ‘पशुगणने’ला सुरुवात; सर्व्हेक्षणासाठी ३७५ कर्मचारी

देशात १९१९ पासून दर ५ वर्षांनी पशुगणना घेण्यात येत आहे. २०१९ मध्ये २० व्या पशुगणनेमध्ये प्रथमच प्रजाती व ग्रामीण आणि नागरी क्षेत्रनिहाय पशुधनाची आकडेवारी गोळा करण्यात आली. २० व्या पशुगणनेच्या अहवालानुसार राज्यामध्ये एकूण ३ कोटी ३० लाख ८० हजार पशुधन असून मागील पशुगणनेच्या तुलनेत १.८३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कोणत्या प्राण्यांच्या होणार नोंदी

कुटुंब घरगुती उद्योग व इतर संस्थांकडून पाळलेल्या गायवर्ग, म्हसवणे, मिथुन, याक, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, शिंगरू, खेचर, गाढव, उंट, कुत्रा, ससा, हत्ती आणि कुक्कुट पक्षी जसे की कोंबडे-कोंबड्या, बदक, टर्की आणि इमू, क्वेल, गिनी, शहामृग तसेच इतर कुक्कुटपक्ष अशा सोळा प्रकारच्या प्राण्यांची जागेवर मोजणी करण्यात येणार आहे. तसेच भटकी कुत्री, गटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय (पॅस्टोरल कम्युनिटी) यांची देखील माहिती गोळा करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com