डॉ. सुषमा घाडीगावकर, डॉ. सोनाली जोंधळेचराऊ कुरणात किंवा शेती बांधावर जनावरे, शेळ्या, मेंढ्या यांना विंचू चावण्याच्या घटना घडतात. विंचू दंशामुळे जनावरांच्या शरीरात विष पसरते.वेळीच उपचार न केल्यास लहान वय आणि दुर्बल जनावरांमध्ये विंचू दंशामुळे गंभीर परिणाम होतात..प्रमुख लक्षणेदंशाच्या जागी वेदना व सूज, लालसरपणा येतो.जनावरे दंश झालेल्या भागाला चाटतात, कुरवाळणे.डोळ्यांतून पाणी येणे, लाळ गळते, अंगाची थरथर.श्वास घेण्यास त्रास, लाळ गळणे किंवा उलटी होते.शरीर थंड होते किंवा ताप येतो. अर्धांगवायू दिसतो.झटके येतात, जनावर बेशुद्ध पडते. गंभीर अवस्थेत मूत्रमार्गावर नियंत्रण रहात नाही.श्वानामध्ये दंशानंतर ८ तासांच्या आत लक्षणे दिसतात..Farmer Safety: विविध दंश, विषबाधेपासून स्वसंरक्षणाच्या उपाययोजना .उपचारप्रथमोपचारदंशाचे स्थान स्वच्छ करून थंड पाण्याने धुवावे. त्या भागावर बर्फ ठेवून सूज कमी करावी.शक्य असल्यास जनावर हालचाल करणार नाही याची काळजी घ्यावी.थंड पाण्याचा कपडा लावून सूज कमी करावी. दंशाची जागा चाटू देऊ नका; आवश्यक असल्यास ‘कॉन कॉलर’ वापरावे.औषधोपचारतत्काळ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने अँटीहिस्टामिन, वेदनाशामक किंवा स्टेरॉइड इंजेक्शन द्यावे.गंभीर परिस्थितीत आय.व्ही. फ्लुइड व अन्य औषधे आवश्यक असतात..खबरदारीचे उपायशेत परिसर, गोठ्याची स्वच्छता ठेवावी.जनावरांना रात्री उघड्यावर बांधू नये.गोठ्याच्या आजूबाजूला झाडेझुडपे, दगडधोंडे काढून टाकावेत. जनावरांच्या अंगावर पाने किंवा गवत टाकू नये.विंचू आढळल्यास तत्काळ तेथून जनावरांना दूर हलवावे..Deathstalker Scorpion : जगातला सर्वात विषारी विंचू ; विषाची किंमत लाखोंमध्ये.श्वान, मांजरामध्ये विंचू दंशश्वानामध्ये विंचू दंश सहसा पायांवर किंवा डोक्यावर होतो. दंशानंतर लंगडणे, पाय चाटणे, डोके हलवणे ही प्रमुख लक्षणे दिसतात. याचबरोबरीने लाळ गळणे, उलटी, श्वास घेण्यास त्रास होतो.डोळ्यांची अनियमित हालचाल दिसते.श्वान अत्यंत गंभीर अवस्थेत झटके देते, बेशुद्ध होते.मांजरामध्ये दंशानंतर वेदना होतात. अस्वस्थता दिसते. काही मांजरांमध्ये केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो..उपचारश्वान, मांजराला शांत ठेवा; हालचाल कमी करावी.दंशाच्या जागेवर थंड पाण्याने स्वच्छ धुवावे.लक्षणे गंभीर असल्यास त्वरित पशुवैद्यकीय सल्ला घ्यावा.पशुवैद्यकीय सल्ल्यानुसार अँटीहिस्टामिन्स द्यावे.प्रतिबंधात्मक उपायघराच्या भिंतीच्या भेगा व फटी बंद कराव्यात.परिसर स्वच्छ ठेवावा.श्वान, मांजराच्या झोपण्याच्या जागा नियमितपणे तपासा. रात्रीच्या वेळी बाहेर सोडताना काळजी घ्यावी..लक्षणेखाणे बंद होते, सुस्ती येते,अतिसार किंवा उलटी होते.पोट फुगते, अपचन होते. चालण्यास त्रास, झटके, अंधत्व.डोळे व त्वचेवर पिवळसरपणा, यकृत निकामी होते.तातडीचे उपचारजनावराला त्वरित कचऱ्यापासून दूर ठेवा. स्वच्छ व गरम पाणी पाजावे.उलटी होत असेल तर शरीरातील पाणी टिकविण्यासाठी पशुवैद्यक सल्ल्याने ओआरएस/ आयव्ही द्रव्य द्यावे. तपासणी करून योग्य औषधोपचार करावेत. लघवी साफ करणारी औषधे द्यावीत.- डॉ. सुषमा घाडीगांवकर, ८६००८४४४३०(औषधनिर्माणशास्त्र आणि विषशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई).कचऱ्यातून होणारी विषबाधा.प्रतिबंधक उपाय.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.