जागतिक कडधान्य दिवस विशेषडॉ. एस. एम. खुपसे जागतिक कडधान्य दिवसाच्या निमित्ताने पशुखाद्यातील कडधान्यांचे महत्त्व ओळखून त्यांचा योग्य वापर केल्यास पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकते. संतुलित आहारामुळे जनावरे निरोगी राहतात, दूध उत्पादन वाढते आणि पशुपालकांचे आर्थिक उत्पन्न सुधारण्यास मदत होते..दरवर्षी १० फेब्रुवारी हा ‘जागतिक कडधान्य दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कडधान्ये ही केवळ मानवी आहारासाठीच नव्हे, तर पशुखाद्यासाठीही अत्यंत महत्त्वाची आहेत. कडधान्यांमधून मिळणारी प्रथिने, ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्त्वे पशुधनाच्या वाढीस, पशुधनाच्या वाढीस, उत्पादनक्षमतेस आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. पशुपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. पशुधनाचे आरोग्य हे मुख्यत्वे त्यांच्या आहारावर अवलंबून असते. यशस्वी दुग्ध आणि पशुपालन व्यवसायाकरिता संतुलित आहार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जागतिक कडधान्य दिवसाच्या निमित्ताने पशुखाद्यातील कडधान्यांचे महत्त्व समजून घेऊयात..Livestock Exhibition: कृषिपर्व महोत्सवात पशुप्रदर्शनाचे आकर्षण.संतुलित आहार म्हणजे काय?जनावरांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणारा, योग्य प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, तंतूमय पदार्थ आणि पाण्याचा समावेश असलेला आहार म्हणजे ‘संतुलित आहार’ होय. फक्त पोट भरणे म्हणजे आहार नव्हे, तर शरीराच्या गरजेनुसार पोषण मिळणे आवश्यक आहे. जनावरांना दिला जाणारा आहार संतुलित नसेल तर जनावर अशक्त होतात, दूध उत्पादन घटते, प्रजननात अडचणी येतात, जनावरांना आजाराचा धोका वाढतो..संतुलित आहाराचे फायदेजनावरांना संतुलित आहार दिल्यास खालील सकारात्मक परिणाम दिसून येतात,वाढ योग्य प्रकारे होते.दूध उत्पादन व दुधातील फॅट वाढते.रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.प्रजननक्षमता सुधारते.वासरांची वाढ जलद व निरोगी होते..Mega Livestock Expo: परळीत १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान भव्य महापशुधन एक्स्पो.पशुखाद्यातील आवश्यक पोषक घटकजनावरांच्या आहारात विविध पोषक घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यात ऊर्जा, प्रथिने, खनिजे व जीवनसत्त्वे, तंतुमय पदार्थ यांचा मुख्यत्वेकरून समावेश असावा.ऊर्जा ः जनावरांच्या हालचाली, शरीराचे तापमान आणि दूध उत्पादनासाठी ऊर्जेची गरज भासते. ऊर्जा प्रामुख्याने धान्ये, कडधान्यांचे दाणे, मका, ज्वारी, बाजरी यामधून मिळते.प्रथिने ः प्रथिने शरीराच्या वाढीस, दूध निर्मितीस व ऊतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात. कडधान्ये ही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत.खनिजे व जीवनसत्त्वे ः कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, झिंक तसेच जीवनसत्त्व अ, ड आणि ई ही हाडे, प्रजनन व रोगप्रतिकारशक्तीसाठी आवश्यक आहेत.तंतूमय पदार्थ ः रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी तंतूमय पदार्थ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात..संतुलित आहार व दूध उत्पादन यांचा संबंधदुधाळ जनावरांना योग्य प्रमाणात ऊर्जा व प्रथिने मिळाल्यास दूध उत्पादनात वाढ मिळते. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की, संतुलित आहार दिलेल्या जनावरांचे दूध उत्पादन १५ ते २५ टक्क्यांनी वाढते.दूध उत्पादन वाढीसाठी,योग्य प्रमाणात हिरवा व कोरडा चारा असावा.कडधान्यांपासून तयार केलेले खाद्य आवश्यक.खनिज मिश्रण व मीठ यांचा समावेश आवश्यक..Livestock Eating Plastic: जनावरांनी अखाद्य वस्तू खाल्ल्या आहेत हे कसं ओळखायचं?.वासरांसाठी संतुलित आहार महत्त्वाचावासरे ही पशुपालनाची भविष्यातील संपत्ती आहेत. नवजात वासरांना योग्य पोषण न मिळाल्यास त्यांची वाढ खुंटते. कडधान्यांपासून तयार केलेला पूरक आहार वासरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. नवजात वासरांना सुरुवातीच्या कोलोस्ट्रम (पहिले दूध) द्यावे. हळूहळू कडधान्य मिश्रित पूरक खाद्य द्यावे. तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी द्यावे..कडधान्यांचे पशुखाद्यातील महत्त्वकडधान्ये ही पशुखाद्यातील महत्त्वाचा घटक आहेत. हरभरा, तूर, उडीद, मूग, मसूर, चवळी, सोयाबीन ही कडधान्ये जनावरांसाठी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहेत.पशुखाद्यामध्ये कडधान्यांचा वापर केल्यास,आहारातील प्रथिनांची कमतरता भरून निघते.दूध उत्पादन वाढते.जनावरांची प्रतिकारशक्ती सुधारते.वासरांची वाढ चांगली होतेविशेषतः सोयाबीन पेंड, हरभरा, तूर कुटार हे पशुखाद्यात मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. - डॉ. एस. एम. खुपसे,८६०५५३३३१५,(विषय विशेषज्ञ (पशुधन व्यवस्थापन), एमजीएम, कृषी विज्ञान केंद्र, गांधेली, जि. छत्रपती संभाजीनगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.