डॉ. सुजाता भटकर Safe Diwali Celebration: दिवाळीचा सण साजरा करत असताना लहान मुले फटाके उडविण्याचा आनंद घेतात. मात्र फटाके ही रंगीबेरंगी आतषबाजी असली, तरी त्यात एक प्रकारची स्फोटके असतात हे लक्षात ठेवावे. त्यातून रंगीत प्रकाश आणि मोठा आवाज निर्माण होतो. लहान मुलांसोबत घरातील मोठी व्यक्ती असणे गरजेचे आहे. फटाके फोडण्याची जागी शक्यतो मोकळ्या पटांगणावर घर, गोठ्यांपासून आणि आग पकडणाऱ्या कोणत्याही बाबीपासून शक्य तितकी दूर असावी. त्यामुळे फटाक्यांच्या आवाज व धुराचा त्रास होणार नाही. फटाक्यांच्या आवाजाने गोठ्यातील जनावरे बिचकणे, अस्वस्थ होणे टाळता येईल. ....अशी घ्यावी पशुधनाची काळजीपाळीव प्राण्यांना घरात एकटे सोडू नये.प्राणी फटाक्यांना घाबरतात, त्यांना फटाक्याजवळ नेऊ नये.फटाक्यांची राख प्राण्यांच्या आहारामध्ये जाणार नाही, याची काळजी घ्याती. प्राणी ती चुकून खाण्याचा धोका असतो. त्यामुळे फटाके फोडून झाल्यावर त्या राखेवर पाणी टाकावे.फटाके सुरक्षितपणे बंद बॉक्समध्ये, थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवावेत. पाळीव प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवावेतफटाक्यांचे डबे पायऱ्यांखाली किंवा पॅसेजमध्ये उघड्यावर ठेवू नये..Agrowon Diwali Ank : पेरणी उमेदीची .दिवाळीत पाळीव प्राण्यांचे रक्षण कसे करावे?गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे इ. पाळीव प्राणी फटाक्यांच्या आवाजांना घाबरतात. या पाळीव प्राण्यांना ऐकण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे धक्के आणि मोठा आवाज यामुळे अनेक प्राणी सुरक्षित आश्रयाच्या शोधात पळून जातात. पाळीव प्राण्यांना बंदिस्त गोठ्यात, घरात आणि परिचित खोलीत ठेवावे. पण त्याचे वायुवीजन चांगले असेल, याची काळजी घ्यावी.जनावरांना २४ तास ताजे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. त्यांना योग्य दर्जाचा चारा आणि पौष्टिक आहार द्यावा. त्यामुळे त्यांना आराम वाटेल..घरात कुत्रा, मांजर किंवा पक्षी यांसारखे पाळीव पशुपक्षी असल्यास घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या शक्यतो बंद ठेवाव्यात. बाहेरील फटक्यांचे आवाज कमी करण्यासाठी पडदे लावावेत. पाळीव प्राण्यांना पुरेसे अन्न आणि पाणी द्यावे.कमी धूर आणि कमी आवाजाचे असे शक्यतो पर्यावरणपूरक फटाके निवडले पाहिजेत.मुक्त संचारासाठी गोठ्यातील प्राणी सोडायचे असतील किंवा घरातील पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी न्यायचे असेल, तर शक्यतो फटाक्यांच्या वेळा टाळून दिवसा (सकाळी ११ ते ५ या काळात) न्यावे..Diwali Traditions: दिवाळीतल्या गवळणी.मोठ्या आवाजामुळे पाळीव प्राण्यांमध्ये अस्वस्थतेसोबत अन्य काही तक्रारी जाणवत असल्यास पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.दिवाळीमध्ये मोठमोठ्या रंगीत रांगोळ्या काढल्या जातात. त्यावर पडलेली खाण्याची वस्तू खाताना पाळीव प्राण्याच्या शरीरात रांगोळी आणि रंग जाऊ शकतात. त्यामुळे रांगोळीसाठी नैसर्गिक, विषारी नसलेले रंग निवडावेत.लहान सजावटीच्या वस्तू उदा. टिनसेल, मणी आणि ग्लिटर्स इ. प्राण्यांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात. त्या चुकून खाण्यात आल्यास त्यांना पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात किंवा गुदमरण्याचा धोका असतो..सोय व काळजीदिवाळीच्या काळात पाळीव प्राण्यांच्या दिनचर्येत लक्षणीय बदल होऊ शकतात, त्याचा अधिक ताण येतो. हे टाळण्यासाठी त्यांच्या नियमित आहार, खेळ आणि विश्रांतीच्या वेळापत्रकाचे पालन करावे.दिवाळीच्या अनेक पदार्थांमध्ये साखर, चॉकलेट किंवा नट्स असतात. असे घटक पाळीव प्राण्यांसाठी (उदा. कुत्र्यांसाठी) विषारी ठरू शकतात. त्यामुळे आपला फराळ त्यांना खाण्यास देणे टाळावे.फटाके वाजवण्याच्या वेळा टाळून त्यांच्या फिरण्याचे किंवा व्यायामाचे नियोजन करावे.प्राण्यांनाही फटाक्यांपासून भाजण्यासारखे अपघात होऊ शकतात. कुत्र्यासारखे पाळीव प्राणी अनवधानाने चाटू किंवा खाऊ शकतात. त्यातून त्यांना अतिसार किंवा उलट्यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. अशावेळी मूलभूत औषधे आणि उपकरणांनी भरलेली आपत्कालीन बॅग नक्की घरात असावी.आपत्कालीन स्थितीसाठी पशुवैद्यकाची नक्की मदत घ्यावी. - डॉ. सुजाता भटकर ७३५०४९२३४३यंग प्रोफेशनल -II, आयसीएआर - एससीएसपी प्रोजेक्ट, पशू आनुवंशिकी व प्रजनन विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.