Dairy Management : दुग्ध व्यवसायाचे यश प्रामुख्याने दुधाळ जनावरावर अवलंबून असते. म्हणूनच गाई, म्हशींची देखभाल, गोठ्याची व्यवस्था, चारा, आरोग्य व्यवस्थापन आणि प्रजनन व्यवस्थापन योग्य असावे. यामुळे दुधाळ जनावरांकडून त्यांच्या संपूर्ण क्षमतेसह दूध उत्पादन आणि प्रजनन होऊ शकेल.