Chicken Care: सध्या कर्नाटकातील काही भागात आणि कर्नाटकालगत येणाऱ्या महाराष्ट्रातील काही गावांमध्ये कोंबड्यांवरचा बर्ड फ्लू रोग पसरत आहे. हा आजार कोंबड्यांसाठी अतिशय घातक असल्याने पोल्ट्री शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे..बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लूएन्झा हा कोंबड्यांमध्ये होणारा अतिशय घातक आणि संसर्गजन्य आजार आहे. हा रोग H5N1 या विषाणूमुळे होतो आणि त्यामध्ये ८० ते १०० टक्क्यांपर्यंत पक्षी दगावू शकतात. या लेखासाठी अकोले येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी मार्गदर्शन केले आहे..Bird Flu Outbreak : केरळमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाने ५४ हजार पक्ष्यांचा मृत्यू; डब्ल्यूओएएच अहवाल.बर्ड फ्लूची लक्षणेबर्ड फ्लूची लक्षणे अचानक आणि तीव्र स्वरूपात दिसतात.कोंबड्यांचे खाणे-पिणे बंद होते व त्या सुस्त होतात.नाक व तोंडातून रक्तमिश्रित स्राव येतो.डोळे, मान व डोक्याचा भाग सुजतो.श्वास घ्यायला त्रास होतो व श्वास घेताना घरघर आवाज येतो.विष्ठा हिरवी किंवा पातळ होते.पायांना सूज येते, चालताना अडखळतात.अंडी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते.काही वेळा कोंबड्या कोणतीही लक्षणे न दाखवता अचानक मरतात..बर्ड फ्लू कसा पसरतो?हा विषाणू फार झपाट्याने पसरतो. तो सहसा स्थलांतरित पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो. त्यांच्या विष्ठेमुळे पाणी, खाद्य आणि परिसर दूषित होतो. यासोबत आजारी पक्षी, मृत पक्षी, दूषित भांडी, वाहने, कामगारांचे कपडे, बूट, उंदीर, कीटक आणि हवेमुळेही रोग पसरू शकतो..Bird Flu Infection: बर्ड फ्लू प्रसार नियंत्रणासाठी प्रभावी जैवसुरक्षा तंत्रज्ञान.प्रतिबंधात्मक उपायबर्ड फ्यूच्या आजाराची लक्षणं दिसण्याचं प्रमाण पक्ष्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून आहेत. त्यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल किंवा टिकवता येईल यावर पशुपालकांनी लक्ष द्यावे.कोंबड्यांना वेळोवेळी मल्टीव्हिटॅमिनचे डोस द्यावे.कोणत्याही रोगाच्या लागणामुळे कोंबड्यांमधील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे वेळापत्रकानुसार योग्य ती लसीकरणे वेळेवर करावे.कोंबड्यांचा वन्यपक्षी आणि स्थलांतरित पक्ष्यांशी संपर्क होऊ देऊ नये.फार्मवर अनावश्यक लोक व वाहने येऊ देऊ नयेत..शेडमध्ये जाळी लावून बंदिस्त व्यवस्था करावी.खाद्य व पाणी झाकण असलेल्या स्वच्छ भांड्यात ठेवावे.प्रवेशद्वाराजवळ फूटबाथ व वाहनांसाठी निर्जंतुकीकरण टँक ठेवावा.मृत कोंबड्या व खराब अंडी खोल खड्ड्यात चुन्यासह पुरावीत.नवीन कोंबड्या किमान ३० दिवस वेगळ्या ठिकाणी ठेवाव्यात.फार्म, भांडी, ट्रे, वाहने यांचं नियमित निर्जंतुकीकरण करावे..महत्त्वाची सूचनासध्या बर्ड फ्लूसाठी प्रभावी लस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. तुमच्या घराच्या कोंबड्यांच्या शेडच्या आसपास स्थलांतरित पक्षाची अनैसर्गिक मरतुक दिसून आल्यास किंवा कोंबड्यांमध्ये अचानक मृत्यू दिसल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात कळवावे किंवा १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.