डॉ. अतुल पाटणेग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये कुक्कुटपालनाचा महत्त्वाचा वाटा आहे. व्यावसायिक ब्रॉयलर आणि लेयर कोंबडीपालन मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी आजही विविध रंगांच्या शुद्ध देशी तसेच सुधारित देशी कोंबड्यांचे पालन देखील किफायतशीर आहे.भारत सरकारच्या पशुपालन व डेअरी विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियानामार्फत (NLM) कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यास ५० टक्के अनुदान देऊन कुक्कुटपालनातून उद्योजकता विकासला गती मिळाली आहे. कुक्कुटपालनातून उद्योजकता विकास करायचा असेल, तर व्यावसायिक दृष्टिकोन आणि शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे. यासाठी कोंबड्यांचे संगोपन कोणत्या पद्धतीने करणार आहोत ते ठरवणे महत्त्वाचे आहे..कुक्कुटपालनाच्या पद्धतीमुक्त संचार पद्धतया पद्धतीमध्ये कोंबड्या मोकळ्या सोडल्या जातात. फक्त रात्रीच्या वेळी निवाऱ्याची सोय केली जाते. दिवसभर मोकळ्या रानात फिरून किडे, पाला, गवत किंवा इतर खाद्य खाऊन ते वाढतात.अर्धबंदिस्त पद्धतगावरान देशी किंवा सुधारित देशी कोंबडी पालनासाठी अतिशय प्रभावी व प्रचलित संगोपन पद्धत आहे. या पद्धतीमध्ये कोंबड्यांना ठरावीक क्षेत्रामध्ये कुंपण घालून मोकळे सोडले जाते.यामध्ये त्यांना निवाऱ्यासाठी शेड असते. शेडमध्ये खाद्य, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच अंडी घालण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. अतिशय कमी खर्चात या पद्धतीमध्ये व्यवसाय सुरू करता येतो..Desi Poultry Farming : गावरान कुक्कुटपालनातून गवसले आर्थिक स्थैर्य .बंदिस्त पद्धतज्या ठिकाणी जागेची कमतरता आहे तसेच व्यवसायात पुढे जाऊन विस्तार करण्याचा विचार आहे अशावेळी बंदिस्त पद्धत अतिशय योग्य आहे.या पद्धतीमध्ये सुरुवातीचा भांडवली खर्च अधिक असला तरी कमी जागेत जास्त कोंबड्यांचे संगोपन केले जाते.बंदिस्त कुक्कुटपालनाचे प्रकारगादी पद्धत/डीप लिटरया पद्धतीमध्ये कोंबड्या लिटरवर ठेवल्या जातात. चिकन उत्पादनासाठी संगोपन केलेल्या कोंबड्यांसाठी ही पद्धत उपयुक्त आहे.पिंजरा पद्धतया पद्धतीमध्ये कोंबड्या विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या पिंजऱ्यामध्ये ठेवतात. स्वच्छ अंडी उत्पादनासाठी ही पद्धत चांगली आहे.वरील कोणत्याही पद्धतीत संगोपन करत असताना पिल्ले व मोठ्या कोंबड्या नेहमी स्वतंत्र व वेगवेगळ्या शेडमध्ये ठेवाव्यात..संतुलित आहार व्यवस्थापनव्यावसायिक ब्रॉयलर व लेयर कोंबड्यांच्या खाद्याच्या खर्चापेक्षा सुधारित देशी कोंबड्यांच्या खाद्याचा तसेच संगोपनाचा खर्च अतिशय कमी असतो. त्यामुळे मका, सोयाबीन, ज्वारी, तांदळाचा कोंडा व खनिज मिश्रण यांच्यापासून बनलेला संतुलित आहार कोंबड्यांना दिल्याने वाढ झपाट्याने होऊन वेळेत वजन वाढते. अंडी उत्पादन देखील वेळेत सुरू होते.कुक्कुटपालनाच्या खर्चामध्ये ६० ते ७० टक्के खर्च हा खाद्यावरती होतो. त्यामुळे खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी कोंबड्यांच्या खाद्यात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत अझोला, टाकाऊ भाजीपाला, शेवग्याचा पाला, लसूण घास वापरून खाद्यावरील खर्चात बचत करता येते..पाणी व्यवस्थापनपिलांना तसेच कोंबड्यांना स्वच्छ व पिण्यायोग्य पाणी देणे गरजेचे आहे कारण बरेचसे आजार हे पाण्यामार्फत होतात. पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी देखील पाणी महत्त्वाचे काम करते.बऱ्याचदा पाणी खराब अस्वच्छ किंवा पाण्याचा जडपणा जास्त असल्याने कोंबड्या पाणी पीत नाहीत किंवा कमी पितात. त्यामुळे वर्षातून किमान एकदा तरी पिण्याच्या पाण्याचा टीडीएस, जडपणा याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी.पिण्याच्या पाण्याची भांडी दररोज आणि पाण्याची टाकी आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवावी. पाण्यात योग्य प्रमाणात अदलून बदलून वेगवेगळे सॅनिटायझर वापरावेत..जातींची निवडदेशी किंवा गावरान कोंबडीची उत्पादन क्षमता मर्यादित आहे. मोठ्या प्रमाणात एकाच वेळी पिले मिळण्यास देखील अडचण आहे. त्यामुळे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये गावरान कोंबड्यांऐवजी सुधारित देशी जातीच्या कोंबडीचे पालन करावे. त्यांचे उत्पादन देशी व गावरान कोंबडीपेक्षा जास्त मिळत असल्याने आर्थिक फायदा वाढतो.सुधारित जातीच्या कोंबड्यांमध्ये स्थानिक वातावरणाशी जुळवून घेण्याची आणि आजाराचा सामना करण्याची क्षमता अधिक असल्याने त्यांची मरतूक कमी असते, उत्पादन चांगले मिळते.सुधारित देशी जातीच्या कोंबड्या ः गिरिराज, वनराज, कावेरी, डी पी क्रॉस, सातपुडा, सोनाली.Backyard Poultry : सुधारित पद्धतीने परसातील कुक्कुटपालन.जैवसुरक्षाव्यावसायिक कुक्कुटपालन हा उद्योग म्हणून करत असताना त्यामध्ये आपल्या प्रक्षेत्रावर जैवसुरक्षा नियमाचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे. रोगप्रतिबंधासाठी हा अतिशय प्रभावी व्यवस्थापनाचा भाग आहे.प्रशिक्षणकुक्कुटपालनाविषयी प्रशिक्षण हे पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मार्फत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांत दिले जाते.पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ः मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर.कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र, मुरुड (जि. लातूर),अमरावती, कणकवली (जि. सिंधुदुर्ग)महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पशुवैद्यकीय महाविद्यालया मार्फत कुक्कुटपालन विषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ः मुंबई, नागपूर, परभणी, शिरवळ, अकोला व उदगीर..विक्री व्यवस्थापनआपण उत्पादित केलेली अंडी, चिकन तसेच कोंबडी खत यांची व्यवस्थित विक्री झाल्यास आपल्याला नफा अधिक मिळवू शकतो. सुधारित देशी कोंबडीची अंडी आणि चिकनला इतर व्यावसायिक कोंबड्यांपेक्षा चांगली मागणी असल्याने त्यांना बाजारभाव देखील अधिक मिळतो.कुक्कुटपालकांनी संघटित विक्री व्यवस्था निर्माण करावी. एकत्रित मोठ्या शहरांमध्ये थेट एकसारखा पुरवठा करावा.वर्षाचे कॅलेंडर बघून कोंबड्यांची बॅच करावी. ठरावीक सणांच्या काळात खूप मागणी असते. उदा. ३१ डिसेंबर, नवीन वर्ष, ख्रिसमस, होळी, आखाडाचा महिना तसेच थंडीच्या दिवसांत अंड्यांना जास्त मागणी असते.जास्तीत जास्त स्थानिक बाजारपेठ, हॉटेल्स, हॉस्पिटल्समध्ये आपले उत्पादन जाईल याकडे लक्ष द्यावे. सतत पुरवठा होईल याचे नियोजन करावे.स्वतः उत्पादित केलेल्या अंडी व चिकन विक्रीसाठी स्वतःचे रिटेल शॉप सुरू करावे. याचे चांगले सादरीकरण व स्वच्छता ठेवावी. उत्पादनाचा स्वतंत्र ब्रॅण्ड विकसित करावा.सोशल मीडियाचा उपयोग करावा. फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सॲपद्वारे आपल्या उत्पादनाची विक्री वाढवावी.गावरान/देशी कोंबडी आणि सुधारित देशी जातींमधील फरकगावरान/देशी कोंबडी सुधारित देशी जातीची कोंबडीवजन १.५ किलो, ५ ते ६ महिने लागतात. १.५ किलो, ३ते४ महिने लागतात.अंडी उत्पादन ७०-८० प्रति वर्षी १५०-१६० प्रति वर्षीअंडी देण्यास सुरुवात ७ ते ८ महिन्यांनंतर ५ ते ६ महिन्यांनंतरखुडूकपणा खूप वेळ राहतो कमी वेळ राहतो.अंडी उत्पादन व पुनरुत्पादन कमी प्रमाणात अंडी, पुनरुत्पादन क्षमता. अंडी आणि पुनरुत्पादन क्षमता चांगली.- डॉ. अतुल पाटणे ८३०८७८९९४८(सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), अकोले, जि. अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.