डॉ. बालाजी घुले, डॉ. सुनील गायकवाडगोठ्यातील डास, माशा आणि इतर लहान कीटकांचा वाढता उपद्रव जनावरांना त्रासदायक असतो. हवेतील आर्द्रता, गोठ्याजवळ साचलेले पाणी आणि अर्धवट स्वच्छता यामुळे या कीटकांना पोषक वातावरण मिळते. परिणामी जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दूध उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. ही परिस्थिती टाळण्यासाठी गोठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि काळजीपूर्वक उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरते. .हवामानातील सतत ओलसरपणामुळे डासांची अंडी कोरडी न होता सुरक्षित राहतात. अळी आणि कोष अवस्था सुलभतेने पूर्ण होते. माशा आणि डासांचे जीवनचक्र जलद गतीने पूर्ण होते, त्यामुळे त्यांची वाढ झपाट्याने होते. डास अंडी केवळ साचलेल्या पाण्यामध्ये घालतात. गोठ्यामध्ये पावसाचे पाणी, जनावरांच्या पिण्याच्या बादल्या, तुटलेली नळ व्यवस्था, शेण पाण्याचा खड्डा इत्यादी ठिकाणी पाणी साचते आणि डासांच्या अंड्यांसाठी हे ठिकाण योग्य ठरते. .Animal Health: खुरांच्या आरोग्यासाठी जनावरांना द्या संतुलित आहार.गोठ्यात ओला चारा, गोमूत्र, शेण, जनावरांची लाळ आणि न सडलेला जैविक कचरा साचून राहतो, माशा आणि डासांना अंडी घालण्यासाठी हे आदर्श ठिकाण ठरते. शेणाच्या साठ्यावर माशा अंडी घालतात, ज्यामुळे गोठा दुर्गंधीयुक्त होतो, आजार पसरण्याचा धोका वाढतो. सडलेला हिरवा चारा आणि पावसामुळे भिजलेल्या कडधान्यांचे अवशेष यामध्ये बुरशी आणि सूक्ष्मजीव वाढतात. त्यामुळे माशांचा प्रादुर्भाव होतो. .गोठ्याचे वातानुकूलन बिघडते. जनावरांच्या श्वसन संस्थेवर परिणाम होतो.माशा, काही प्रकारचे डास हे प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. रात्री गोठ्यात पिवळसर दिवे असल्यास माशांची झुंबड उडते. जनावरांचे शरीर उष्ण असल्यामुळे त्यांच्याकडेही कीटक आकर्षित होतात. डास हे विविध रोगांचे वाहक असतात. परजीवींचा प्रसार डासांमुळे होतो. यामुळे जनावरांना ज्वर, अशक्तपणा, दूध बंद होणे, गर्भपात या समस्या होऊ शकतात..Animal Health : बुरशीजन्य चाऱ्यामुळे होतो गर्भपात .जनावरांवर होणारे परिणामडास चावल्यामुळे जनावरांच्या त्वचेवर लालसरपणा, सूज, खाज व फोड दिसून येतात.या भागांमध्ये जनावरे सतत चाटत राहतात किंवा शेपटीने फटकारतात, ज्यामुळे जखम होऊ शकते.सतत खाज येण्याने जनावरांचे खाणे-पिणे कमी होते, झोप होत नाही, ते अस्वस्थ रहातात.काही वेळेस हे फोड दुर्गंधीयुक्त व्रणात बदलतात.माशा आणि डासांचा त्रास झाल्यामुळे जनावरांना विश्रांती मिळत नाही. दुधाळ जनावरांमध्ये तणाव वाढतो, ज्यामुळे ऑक्सिटोसिन कमी प्रमाणात तयार होते. परिणामी, दूध उत्पादनात १० ते २५ टक्यांपर्यंत घट येऊ शकते. या काळात मिळणाऱ्या दुधाचे फॅट, एसएनएफ चे गुणधर्म कमी होतात.डास व माशा विविध रोगकारक परजीवींचे वाहक असतात. यांच्या प्रसारामुळे जनावरांच्यामध्ये ताप, अशक्तपणा, डोळे पांढरे होणे, अंगावर फोड अशी लक्षणे दिसतात.माशांमुळे होणारा रक्ताचा संसर्ग होतो. यामुळे ताप, थकवा, हिरवी लघवी, गर्भपात अशी लक्षणे दिसतात.बबेसिओसीस हा आजार माशांमुळे पसरतो. या आजारामुळे ताप, पचन बिघडणे, मृत्यू होण्याचा धोका असतो.फेस फ्लाय आणि ब्लोह फ्लाय या माशा जनावरांच्या डोळ्यांभोवती बसतात. या माशा डोळ्यातील पाणी शोषतात, परिणामी डोळ्यांना सूज येते.माशी जर जखमेवर बसली तर तिथे पायोडर्मा होतो आणि जखम सडते. उघड्या जखमा असलेल्या जनावरांमध्ये मायासिस होण्याचा धोका असतो.सतत डासांच्या त्रासामुळे जनावरांचे उष्मा दर्शविण्याचे वर्तन कमी होते. त्यामुळे कृत्रिम रेतन करताना वेळेवर हीट ओळखता येत नाही. प्रजनन कार्यक्षमता कमी होते..प्रतिबंधात्मक उपायदररोज गोठा धुवावा. जमिनीवर ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी.चाऱ्याचे उरलेले अवशेष वेळेवर गोळा करावेत.जनावरांचे लघवीचे साचलेले पाणी तत्काळ गोठ्याबाहेर काढून टाकावे.गोठ्याच्या छताखाली स्टिकी ट्रॅप लावल्याने डास मोठ्या प्रमाणात अडकतात.गोठ्यामध्ये संध्याकाळी गवती चहा, लवंग, किंवा कडूलिंब तेलाचा धूर करावा.गोठ्यात जैविक कीडनाशकांची फवारणी करावी.जनावरांच्या अंगावर कडूलिंब तेल किंवा मच्छर प्रतिबंधक औषध लावावे. रात्रभर गोठ्यात मच्छरदाणी लावावी.गोठ्याच्या सभोवतालच्या भागात तुळस, गवती चहा, लवंग यासारख्या वनस्पतींची लागवड करावी.- डॉ. बालाजी घुले ९८६०७०५१५०(दुग्ध शास्त्र विभाग,संजीवनी महाविद्यालय, चापोली,जि. लातूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.